कवठाळा इरई मार्ग ठरतो आहे जिवघेणा
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
कोरपणा तालुका प्रतिनिधी निखिल पिदूरकर 9067769906
कोरपणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कवठाळा , इरई मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिवघेणा ठरत आहे. मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात झाले असून बांधकाम विभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत कां ? असा सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे.
कवठाळा, बोरगाव, इरई , मार्ग हा नेहमीच नागरिकांसाठी त्रास दायक ठरलेला आहे. प्रवासी वाहनांसह प्रवाशांना वेदनादायी असुन सततच्या पावसामुळे मार्ग उखळत चालला आहे. यामुळे पावसाचे पाणी साचुन मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचुन राहत असल्याने कित्येक अपघात झाले आहेत. अपघातात जिवहानी झाली आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. अशा दैयनिय मार्गामुळे व वाहनांना अडथळा निर्माण होत असल्या कारणाने परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या बंद पडल्या असुन विद्यार्थी, पालक, शेतकरी व शासकीय कार्यालयीन कामांना विलंब होऊन अनेकांचे नुकसान होत आहे.
मागील दोन वर्षांपासून या मार्गाचे काम करण्यात आले. मात्र अभियंते व ठेकेदारांच्या दर्जाहीन आणि गुनवता नसलेल्या कामाचा परिणाम मार्ग उखडु लागलेला आहे. या क्षेत्राचे लोकप्रतिनिधींनी, स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे या भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.