श्री कोंडय्या महाराज संस्थान तर्फे मोफत नेत्रतपासणी तथा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

राजु ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी :-माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सूधिरभाऊ मुनगंटीवार लोकसेवा समिती तथा श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान धाबा यांच्या सयूक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी तथा मोफत मोफत मोतीबींदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान संस्थान परिसरात हे शिबीर दिनांक 29 सप्टेंबरला होणार आहे.शिबीरास डाॕ.के.एस.लांजेवार,डाॕ.एस.जी.बुर्हाण,डाॕ.एम.एस.पेंदाम,डाॕ पवन गणपुरे यांची उपस्थिती असणार आहे.परिसरातील गरजू रूग्णांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आव्हान संस्थानचे अध्यक्ष अमरभाऊ बोडलावार,सचिव किशोर अगस्ती यांनी केले आहे.