निमजी येथे राष्ट्रवादीची कार्यकारिणी गठित.

57

निमजी येथे राष्ट्रवादीची कार्यकारिणी गठित.

निमजी येथे राष्ट्रवादीची कार्यकारिणी गठित.
निमजी येथे राष्ट्रवादीची कार्यकारिणी गठित.

युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर:- नागपुर जिल्हातील कळमेश्वर तालूक्यातील निमजी येथे नूकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नव्याने बांधणी करण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश सचिव अविनाश गोतमारे, नागपूर जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या निर्देशानुसार तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस युवराज मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली निमजी येथे सभा घेण्यात आली. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून कळमेश्वर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष भुजंग मोजनकर तसेच कळमेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका महिला सरचिटणीस सोनालीताई गोंडाणे, मनीष शेंडे, माजी उपसरपंच वसंतराव शेंडे, सामाजिक कार्यकर्ते योगेश भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत निमजी येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची कार्यकारिणी गठित करण्यात आली.

नागपुर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्यात अनेक नव नविन कार्यक्रर्ते पक्षात येत आहे. त्यामूळे निमजी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ललित ठाकरे तर सचिव म्हणून विनोद भोयर यांची नियुक्ती करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी प्रशांत भोयर यांची तर सदस्य म्हणून कैलास बांबल, आनंदराव कसरे, दिलीप सोमकुवर, निखिल लोंढे, उल्हास गाढवे, अनिकेत गोवर , दीपेंद्र गजभिये, सुरज गजभिये, प्रशांत बावणे, नीलेश शेंडे, भूषण काळे, सुरेखाबाई सोमकूवर, चंद्रकला भोयर, अजय सोनटक्के, अमोल इंगोले यांची राष्ट्रवादीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.