शेलूबाजार तेथे लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट कडून मोफत शेक्षणिक साहित्य वाटप.

विनायक सुर्वे ✒
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
9011122836
वाशिम:- लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट व शेअर अँड केअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विघमाने मागील अकरा वर्षांपासून अनाथ, एकल पालकतत्व, आदिवासी आणि दुर्लक्षित दुर्गम भागातील गरीब मुला सोबत वाशिम जिल्ह्यात शेअर अँड केअर फाउंडेशन शेलुबाजार, या ठिकाणी काम करत आहे. प्रत्येक मुलगा शाळेत गेला पाहिजे आणि तो शाळेत टिकला पाहिजे, त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या साठी यावर्षी मानोरा येथे सत्तर विद्यार्थ्याची निवड करून त्यांच्या सोबत संस्था काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून यावर्षी शेलुबाजार येथे सत्तर मुलांना २५ सप्टेंबर २०२१ रोजी लक्ष्मीचंद विद्यालय येथे शेक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे . प्रमुख पाहुणे विद्यालयाचे शिक्षक श्री. गवारगुरू सर, गीतेसर, आणि प्रकल्प अधिकारी रामहरी इरकर हे उपस्थित होते. कोरोना आजार लक्षात घेऊन मास्क सेनिटायजर आणि दोन व्यक्तीतील आंतर या सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करण्यात आले. विध्यार्थी व पालक यांनी डॉ. विली मॅडम यांचे आभार मानले. या साठी प्रकाश सावंत, उमेश पुरी (गणित विषयाचे शिक्षक), संध्या गिरी (इंग्रजी विषयाच्या शिक्षीका) , विनोद गिरी (इंग्रजी विषयाचे शिक्षक) या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here