शिंदाड व ईतर परिसरात अतिवृष्टीने पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067
शिंदाड व आजुभाजु च्या परिसरातील वाडी -शेवाळे पिंपळगाव भोजे वरखेडी राजुरी सातगाव सार्व. पिप्री व काही गावातील अतिवृष्टीने पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ
या भागात असलेले या परिसरात एक दोन दिवसाआड जोरदार पाऊस सुरू असून यामुळे परिसरातील पिके पूर्णतः खराब झाली आहे आद्रक मका जवारी आदी पिकांवर नागर फिरवण्याची वेळ आज आल्याने व कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.अतिपावसाने कपाशी पीक वाया गेल्याने कर्ज कसे फेळणाऱ्या संकटात कर्जबाजारी शेतकरी सापडला आहे शेतात या वर्षी कपाशीची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीपासून का पावसाने चांगली साथ दिल्याने कपाशी पिके जोमात होती या वर्षी मोठ्या प्रमाणावर उत्पादन येणार अशी आशा होती मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कुठे ढगफुटी तसेच मुसळधार पावसाने हा परिसर झोडपून काढला आहे. एक सारखा पाऊस असल्याने होत्याचे नव्हते झाले आहे. कापसाच्या कैऱ्या सडल्या.
कापसाच्या सडलेल्या कैऱ्या तोडून त्यातून ओला कापूस काढण्यासाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. मजूर मिळेनासे झाले आहे. आणि ही खर्चिक बाब शेतकऱ्यांसाठी आहे मे महिन्यात लागवड झालेला कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे जून महिन्यात लागवड झालेले कपाशी पिकांची फुल पगडी गळून पडल्याने कपाशीचे उत्पादन मोठी घट होण्याची शक्यता आहे कापसाच्या सडलेल्या कैऱ्यांनी बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे.मदतीची अपेक्षा
ऐन तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेत असल्याने शेतकऱ्यांनी करावे काय हा प्रश्न पडला आहे अगोदरच संकटात सापडलेला बळीराजा याच बळीराजा वर निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ येऊन ठेपली आहे
अति पावसाने कपाशी पीक आता पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्यासारखेच आहेत. म्हणून शासनाने सरसकट मदत द्यावी. तसेच विमा कंपनीने वेळ न घालवता पूर्ण विमा मंजूर करावा.
*शेतकरी*
हिलाल रामदास पाटील
आनदा चौधरी अभय दादा शरद पाटील सुनिल सुतार अशोक संपकाळे . तुषार लोधी . विकास पाटील .अतुल पाटील . शरद रमेश पाटील समाधान भगवान पाटील सचिन पाटील . रामकृष्ण पांडूरंग सुतार रोहीदास पाटील जितेद्र चौधरी समाधान सिताराम पाटील किरण पाटील किशोर टेलर शाम टेलर येथील परिसरातील शेतकरी अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.