त्या गुंड स्वभावाच्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करा.. आप चे शहर सचिव राजु भाऊ कुडे

51

त्या गुंड स्वभावाच्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करा.. आप चे शहर सचिव राजु भाऊ कुड

त्या गुंड स्वभावाच्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करा.. आप चे शहर सचिव राजु भाऊ कुडे
त्या गुंड स्वभावाच्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करा.. आप चे शहर सचिव राजु भाऊ कुडे

संदीप तुरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
Mob… 9834024045

चंद्रपूर- दिनांक २५/०९/२०२१ ला सेंटर फॉर डेवलॉपमेंट कम्युनिकेशन चंद्रपूर येथे कार्यरत कर्मचारी श्री सचिन जीवने याला तेथील मॅनेजर अविनाश कोतपल्लीवार यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना आशीर्वाद सभागृह जवळील CDCC कार्यालयात घडली.

महानगरपालिकेचे कचरा संकलन करण्याचे काम या CDCC कंपनीला मागील ५-६ वर्षापासून मिळालेले असून तिथे कार्यरत अविनाश कोतपल्लीवार नावाचा संबधीत अधिकारी हा आपल्या कर्मचाऱ्यां सोबत क्रूरतेने वागत असल्याचे तक्रार तेथील वाहन चालक, सुपर वायजर, हाथ ट्रॉली, कामगार हे वारंवार करीत आले आहे. परंतु चंद्रपूर महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचे कामगार युनियनचे सदस्य यांनी म्हटले आहे. महानगर पालिका आणि CDCC या कंपनीच्या व्यवस्थापनाच्या या उदासीनतेमुळे क्रूर व्यक्तीचे आपल्या कर्मचाऱ्यांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाही आहे, आज तेथील कर्मचारी श्री सचिन जीवने या व्यक्तीवर अश्लील शिवीगाळ करून त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. ज्या मध्ये त्याचा डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत संपूर्ण माहिती ची तक्रार आम आदमी पार्टी चंद्रपूर चे शहर सचिव राजु भाऊ कुळे यांना मिळाली याची तात्काळ दखल घेत आपल्या टीम सोबत पिढीतेला घेऊन रामनगर पोलीस स्टेशनला त्या व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.. मनपा प्रशासनाने अश्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी जेनेकरून भविष्यात अश्याप्रकारचे कृत्य कुणीही करण्याचे हिम्मत करणार नाही अशी विनंती मनपा प्रशासनाला आप तर्फे करण्यात आली.
यावेळेला आप चे शहर सचिव राजु भाऊ कुळे, बाबुपेठ प्रभाग संयोजक निखिल बारसागडे, अश्रफ सय्यद, चंदु भाऊ मादुरवार, सुरेन्द्र जीवने, महेश गुरूनुले, प्रकाश जुमडे,जयदेव देवगडे, प्रवीण चुनारकार, शैलेश सोनकुसरे, सचिन जीवने, अंकुश राजूरकर, शंकर भाऊ निखाडे,जयंत थूल, सोशल मीडिया प्रमुख राजेश भाऊ चेडगुलवार, कालिदास ओरके, झोन संयोजक सुखदेव दारूंडे, श्रीमती सुजाता बोदेले, ऐश्वर्या वासनिक, अंजू रामटेके, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..