जोगेश्वरीत नवरात्रौस्तवनिमित्त शामनगर राजमाता स्थापनेचा भव्यदिव्य आगमन सोहळा

49

जोगेश्वरीत नवरात्रौस्तवनिमित्त शामनगर राजमाता स्थापनेचा भव्यदिव्य आगमन सोहळा

जोगेश्वरीत नवरात्रौस्तवनिमित्त शामनगर राजमाता स्थापनेचा भव्यदिव्य आगमन सोहळा

पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं. – ८१४९७३४३८५

जोगेश्वरी :- जोगेश्वरीतील दुबे- पांचाळ इस्टेट सार्वजनिक नवरात्रौस्तव मंडळातर्फे शामनगर राजमातेचे मोठ्या जल्लोष्यात आगमन करण्यात आले. या नवरात्रौस्तव मंडळाचे राजमाता स्थापनेचे हे ३९ वे वर्ष असून हा जोगेश्वरीतील भव्य असा आगमन सोहळा ठरला. शामनगर राजमातेच्या आगमनप्रसंगी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरणुकीत जोगेश्वरीतील महिला वर्गाचा पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. या मिरवणूक दरम्यान महिलांनी केलेली पारंपरिक वेशभूषा, फटाक्यांची आतिषबाजी, आकर्षक विद्युतरोषणाई, राजमातेवर फुग्यातून केलेली वृष्टी, पारंपरिक वाद्य, ढोल ताशा पथक हे खास आकर्षण ठरले.