शाक्त राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ला येथे उत्साहात साजरा
गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०
रायगड- न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता,वैचारिक बांधिलकी व सर्वधर्म समभाव अश्या अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करण्यासाठी किल्ला रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शाक्त राज्याभिषेक (द्वितीय) सोहळा साजरा करण्यासाठी बौध्दराजे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासन मा.ऍड. अमोलकुमार बोधिराज, दिपिका आग्रे,प्रबोध पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच होळीचा माळ येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मा.मनिष जाधव व समाधी येथे मा. दिपीका आग्रे मा.रविंद्र मोहिते, यांनी पुष्पहार अर्पण करून समितीच्या वतीने मानवंदना करून उत्स्फूर्तपणे मोठ्या उत्साहात सोहळा साजरा करण्यात आला.
२४ सप्टेंबर १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी बौद्ध धम्मातील शाक्त (तंत्रयान) पंथानुसार आपला राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांवर बौद्ध विचारांचे म्हणजेच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा प्रभाव होता. वैदिक (हिंदू) धर्मातील मनुस्मृतीनुसार शूद्रांना अतिशुद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता. छत्रपती शिवरायांनी मनुस्मृती व वैदिक (हिंदू) संस्कृतीची सर्व बंधने तोडून शुद्र अतिशुद्र यांच्या हातात शस्त्र दिली. छत्रपती शिवरायांनी आपल्या सैन्यात सर्वांना योग्य ते स्थान दिले. तिथे कोणताही भेदाभेद पाळला नाही समतेचे व न्यायाचे तत्व शिवाजी महाराजांनी माता जिजाऊंकडून स्वीकारले.
अशा बौद्ध विचारांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या राज्याभिषेक दिनी २४ सप्टेंबर रोजी किल्ले रायगड येथे दरवर्षी प्रमाणे अभिवादनाचा कार्यक्रम करून समतेच्या विचारांशी कटिबद्ध राहण्याचा संकल्प उपरोक्त समितीतर्फे करण्यात आला. सदर अभिवादनाच्या कार्यक्रमास बौध्दराजे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी येथे पुष्पहार अर्पण करून, बुद्ध वंदना घेऊन समितीच्या वतीने मानवंदना करून उत्स्फूर्तपणे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
सदर रायगड किल्ल्यावर शाक्त राज्याभिषेक सोहळासाठी (छत्रपती शिवाजीराजे भोसले) भूमिका- स्वराज्य कदम आणि (छत्रपती संभाजीराजे भोसले) भूमिका- स्थविर मोहिते या बालकलाकार म्हणून कौतुकास्पद सोहळ्यामध्ये मुख्य उपस्थिती सर्शवली होती.
शाक्त राज्याभिषेक राज्यभरातील अनेक संस्था, संघटना, समिती इत्यादी मावळ्यांनी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करण्यासाठी हाजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
तसेच छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या मातोश्री जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधी (पाचाड) येथे मा.ऍड. रुपाली खळे आणि मा.सनी कांबळे, मा.मंगेश खरात यांनी पुष्पहार अर्पण करून समितीच्या वतीने वंदन केले.
महाड चवदार तळे या ऐतिहासिक क्रांती भूमीला समितीच्या वतीने भेट देण्यात आली.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मा.दिनेश जाधव मा.वैशाली कदम,मा.मनिष कदम,मा.पिलाजी कांबळे, मा.गुणवंत कांबळे,मा.अभिषेक कासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
सदर अभिवादन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. वैभवजी मोहिते यांनी केले. राज्याभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी मावळे किरण गमरे, प्रशांत साळवी, संदीप आग्रे, नितिन सातपुते, योगेश कांबळे, श्रेयस जाधव, आकाश मोरे, कमलेश मोहिते, रुपेश कदम, संदिप पालकर, प्रबोध मोहिते, ज्योती मोहिते, प्राची मोहिते, मिताली गमरे, श्रावस्ती आग्रे, सेजल सातपुते,कांचन जाधव, मनिष कदम उपस्थित होते.