जोगेश्वरीत नवरात्र उत्सवनिमित्त मनसेकडून स्वच्छता मोहीम

45

जोगेश्वरीत नवरात्र उत्सवनिमित्त मनसेकडून स्वच्छता मोहीम

जोगेश्वरीत नवरात्र उत्सवनिमित्त मनसेकडून स्वच्छता मोहीम

पूनम पाटगावे
मो. नं. ८१४९७३४३८५
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी

जोगेश्वरी :- जोगेश्वरीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक ७३ च्या माध्यमातून रविवार दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी येणाऱ्या नवरात्र उत्सवनिमित्त जोगेश्वरी गूंफेमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परिवर्तन सेवा या हाती घेतलेल्या उपक्रम अंतर्गत ही स्वच्छता मोहीम घेण्यात आली तसेच अदानीच्या माध्यमातून पथ दिवे दुरुस्ती, मनपा च्या माध्यमातून धूर फवारणी व कुसरुंडे फवारणी, चाळीतील गटारावरील तुटलेले ढापे बदलून देणे, अतिवृष्टीमुळे झाडे पडलेल्या ठिकाणी जाऊन मनपाशी संपर्क साधत झाडे उचलण्यास मदत करणे अशी अनेकविध लोकहिताची कामे यातून करण्यात आली. जोगेश्वरी गूंफा स्वच्छता मोहीम राबविण्याकरिता मनसेचे शाखाध्यक्ष श्री. रमाकांत नर आणि त्यांसोबत सर्व पदाधिकारी उपस्थित होते.