नगरपालिकेच्या हलगर्जी पनामुळे मेंढे कुटंब उघड्यावर
✍ *हर्षल राजेंद्र पाटील* ✍
📰 *मोर्शी तालुका प्रतिनिधी*📰
📱 *8600650598* 📱
*हिवरखेड ( शे.घाट ) : – वरुड येथून अगदी जवड असलेल्या शेंदूरजना घाट येथील राजकमल चौक परिसरात वास्तव्यास असणारे किशोर मेंढे यांचे राहते घर असून याच घराच्या मागे असणा-या सदरहु व्यक्तीने किशोर मेंढे यांच्या घराच्या भिंतीला लागूनच घरागुती संडासाची पाईप लाईन जमीन खोदून टाकण्यात आली आहे.या वेळी किशोर मेंढे यांनी न प मध्ये या संदर्भात तक्रार सुद्धा दाखल केली होती की माझा घराच्या मागे राहत असलेल्या सदरहु व्यक्तीने पाईप लाईन दाबल्यामुळे माझे नुकसान होणार असल्याची दाट शक्यता आहे व भविष्यात ही भिंत पडण्याची तक्रार त्यांनी दिली. असे झाल्यास याला न. प.प्रशासन जबाबदार राहील. पण न प ने तक्रार दाखल करून देखील आज पर्यंत कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे किशोर मेंढे यांच्या घराची एका बाजुची भिंत मागील वर्षी पडली व दुसऱ्या बाजुची भिंत या वर्षी पावसाळ्यात पडली त्यामुळे किशोर मेंढे यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. जर न. प. ने योग्य वेळी त्वरीत दखल घेतली असती तर त्यांच्या वर आज हि परस्थिती ओढवली नसती. किशोर मेंढे यांनी न. प. मध्ये वारंवार तक्रार देवूनl सुद्धा कोणतीच कारवाई न केल्याने अखेर जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या कडे सुद्धा तक्रार करण्यात आली होती.*
*येथील अतिक्रमण अधिकारी समाधान काटे यांच्या कडे सदर विभागाचे काम असून सुद्धा ते कोणत्याच प्रकारचे लक्ष देवुन तक्रार कर्त्याचे समाधान करू शकले नसल्याने मोलमजुरी करून उदर्निवाह चालवणा-या व्यक्तीचे नुकसान होत आहे. तरी वरीष्ठानी त्वरीत दखल घेऊन किशोर मेंढे यांच्या पडलेल्या भिंती त्वरीत बाधून देण्यात याव्या व अतिक्रमण अधिकारी समाधान काटे यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी किशोर मेंढे यांनी केली आहे.*