मुलं दत्तक घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची गरज
आजच्या काळात प्रत्येकालाच आपल्या घरात मूल व्हावे असे वाटते जेणेकरून कुटुंब परिपूर्ण वाटेल. दरम्यान, अशी अनेक जोडपी आहेत जी जैविक दृष्ट्या मूल होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत ते मूल दत्तक घेण्याचा विचार करतात. आपल्या देशात मूल दत्तक घेण्यासाठी आवश्यक नियम आणि कायदे बनवण्यात आले आहेत, ज्याची माहिती लोकांना असणे गरजेचे आहे.
पण भारतात मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. त्याचे काही नियम, कायदे आणि कायदे आहेत. ज्यामध्ये मूल होण्यासाठी २ ते ५ वर्षे लागतात.अशा स्थितीत सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी करून ही प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली आहे.भारतात दत्तक घण्याची प्रक्रिया थोडी किचकट व गुंतागुंतीची व वेळखावू आहे.
भारतात मूल दत्तक घेण्याची प्रकिया Central Adoptiver Resource Agency या केंद्रीय संस्थेतर्फे पार पडते. ही प्रक्रिया किचकट आणि आणि वेळखाऊ आहे. ती आता आणखी गुंतागुंतीची झाली आहे.
भारतात मूल दत्तक घ्यायचं असेलव तर हिंदू दत्तक कायदा (१९५६) आणि बालन्याय कायदा (२०१५) अस्तित्वात आहे.
बालन्याय कायदा २०१५ मध्ये झालेल्या सुधारणेमुळे दत्तक विधान देण्याचा अधिकार कोर्टाऐवजी आता जिल्हा दंडाधिकाऱ्यांना म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे हजारो पालकांना मूल दत्तक मिळण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.
जुलै २०२१ मध्ये बालन्याय कायदा सुधारणा २०२१ संमत केला. त्यामुळे बाल न्याय कायदा (२०१५) मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
या कायद्याच्या कलम ६१ नुसार दत्तक विधानाचे आदेश काढण्याचा अधिकार आता कोर्टाऐवजी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.प्रकरणांचा वेगाने निपटारा करण्यासाठी ही सुधारणा करण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे. तसंच मुलांची काळजी घेणाऱ्या संस्था, जिल्हा बालकल्याण समितीस, बालन्याय हक्क समिती, यांच्यावर लक्ष ठेवण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला आहे.
या सुधारणा १ सप्टेंबर २०२२ पासून लागू झाले आहेत.या सुधारणेमुळे काय अडचणी येऊ शकतात?
या सुधारणांमुळे दत्तक घेण्याची सगळी प्रक्रिया पहिल्यापासून करावी लागणार आहे. यासंबंधी कोर्टात अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टाला किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांना या कायद्यातल्या सुधारणांची माहितीच नाही. त्यामुळे प्रक्रिया अधिकाधिक लांबणीवर पडणार असल्याची शक्यता आहे.
भारतात मूल दत्तक घेण्याच्या आकडेवारीत दिवसेंदिवस घट होत आहे. २०१९-२० मध्ये ३३५१ बालकांना दत्तक घेण्यात आलं. २०२०-२०२१ मध्ये ३१४२ मुलांना दत्तक घेण्यात आलं होतं.२०२१-२२ मध्ये या संख्येत प्रचंड घट झाली. या काळात फक्त २९९१ मुलांना दत्तक घेण्यात आले.
विवाहित कुटुंबाव्यतिरिक्त, एकल पालक किंवा जोडपे दोघेही मूल दत्तक घेऊ शकतात. मात्र, विवाहित जोडप्यांसाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत.मूल दत्तक घेण्याचे नियम काय आहेत?
जर विवाहित जोडप्याने मूल दत्तक घेतले असेल तर त्या जोडप्याचे लग्न किमान २ वर्षे झाले पाहिजे.
दत्तक घेतलेल्या मुलाच्या पालकांना पूर्वीचा कोणताही जीवघेणा आजार नसावा.
मूल आणि पालक यांच्या वयात किमान २५ वर्षांचा फरक असावा.
मूल दत्तक घेण्यासाठी, दोन्ही पालकांची संमती असणे आवश्यक आहे.
जर एखाद्या महिलेला मूल दत्तक घ्यायचे असेल तर ती मुलगा किंवा मुलगी यापैकी एकाला सहज दत्तक घेऊ शकते.जर पुरुषाला मूल दत्तक घ्यायचे असेल तर फक्त मुलगाच दत्तक घेण्यासाठी दिला जातो.
जोडपे मुलगा किंवा मुलगी दत्तक घेऊ शकतात.
मूल दत्तक घेताना पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली असावी.
दत्तक घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
दत्तक कुटुंबाचा सध्याचा फोटो,मूल दत्तक घेणाऱ्या कुटुंबाचे किंवा व्यक्तीचे पॅनकार्ड,जन्म प्रमाणपत्र किंवा असा कोणताही दस्तऐवज जो त्या व्यक्तीची जन्मतारीख सिद्ध करू शकेल.
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, नवीनतम वीज बिल, टेलिफोन बिल यापैकी कोणतेही एक कागदपत्र असणे खूप महत्वाचे आहे.
त्या वर्षाच्या आयकराची अस्सल प्रत
दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्याला त्यांचे संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागते. ते प्रमाणपत्र सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र असू शकते. जेणेकरून मूल दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा आजार नाही हे सिद्ध करता लागतो.
दत्तक घेणारी व्यक्ती विवाहित असल्यास, विवाह प्रमाणपत्र (विवाहित असल्यास)
जर ती व्यक्ती घटस्फोटित असेल तर त्याचे प्रमाणपत्र.
दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीशी संबंधित दोन लोकांचे विधान.
जर इच्छुक व्यक्तीला आधीच मूल असेल आणि त्याचे वय पाच वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्याची संमती.
CARA च्या मते, दत्तक प्रणालीमध्ये अनेक समस्या आहेत परंतु सर्वात मोठी समस्या ही आहे की तिच्या नोंदणीमध्ये खूपच कमी मुले आहेत. आकडेवारीनुसार, दत्तक पूलमध्ये केवळ २१८८ मुले आहेत, तर ३१,००० हून अधिक पालक मूल दत्तक घेण्याची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे कुटुंबांना मूल दत्तक घेण्यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागत आहे. याचा सर्वाधिक फायदा बाल तस्करांना होत आहे. या पार्श्भूमीवर दत्तक विधान प्रक्रिया अधिक सरल करण्याची गरज आहे
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
९५६१५९४३०६