गणेश विसर्जन करताना पाळा हे महत्त्वाचे नियम…

56

गणेश विसर्जन करतांना सर्वांनीच सावधगिरी बाळगावी 

सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील अनेक भागात अचानक अतिवृष्टीमुळे अनेक भाग जलमग्न झालेला आहे.यामुळे नदी-नाले,तलाव,विहीरी या सर्व तुडुंब भरलेल्या आहेत.गणपती स्थापनेच्या दिड दिवसांपासून गणपती बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात झालेली आहे.त्यामुळे बाप्पाचे विसर्जन करतांना सर्वांनीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.कारण मागील वर्षी भंडारा जिल्ह्यातील खमारी या गावी काणोबा (कृष्णकन्हैया) विसर्जित करायला 6 लोक नावेत बसले होते व नाव उलटली परंतु वेळीच आजुबाजुच्या नागरिकांनी सतर्कता बाळगुन संपूर्ण सहाही भावीकांचे प्राण वाचवले व दुर्घटना टळली.अशा अनेक दुर्घटना झालेल्या आहेत.त्यामुळे गणेश विसर्जन सावधगिरीने करावे.

लहान मुलांना विसर्जन स्थळापासुन दुरच ठेवावे.कारण लहाणशी चुक परिवारावर मोठा आघात करू शकते.कारण खेड्यापाड्यात, शहरात बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी भक्तगण विसर्जनाच्या ठिकाणी जातात.अशा परिस्थितीत कोणताही धोका ओढावून नये याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. गणेश विसर्जनासाठी तलावांवर बंदी आहेच.परंतु प्रशासनाने जे गणेश विसर्जनाचे ठिकाण(स्थळ)दिले आहे तीथेच विसर्जन करायला हवे.कारण एखादी अकस्मात घटना घडली तर प्रशासन आपल्या मदतीला धावून येवु शकते.त्यामुळे प्रशासनाचे नियम पाळुन  सर्वानी गणेश विसर्जनाचा आनंद घ्यावा व सावधगिरी बाळगावी.

आपण अनेकदा पाहिले व ऐकले सुध्दा आहे की मुर्ति विसर्जनाच्या वेळेस जिवीत हानी व दुर्घटना सुध्दा झालेल्या आहेत.या संपूर्ण गोष्टी डोळ्यासमोर ठेवून व सतर्कता बाळगुन गणेश विसर्जन केले पाहिजे.त्याचप्रमाणे सरकारने व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.ज्या-ज्या ठीकाणी कृत्रीम तलाव (आर्टीफीशीयल टॅंक)ची व्यवस्था आहे, त्या-त्या ठिकाणी त्याचा उपयोग सर्वांनीच केला पाहिजे.परंतु ज्या ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था नाही असे भक्तगण नदी किंवा तलावामध्ये गणरायाचे विसर्जन करतात त्या-त्या ठिकाणी सर्वांनीच विसर्जन करतांना सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.मुख्यत्वेकरून मंडळांचे मोठे गणपती असतात.अशा परिस्थितीत मंडळाच्या भक्तांनी गणपती विसर्जन करतांना सतर्कता बाळगून विसर्जन करावे.कारण थोडीशी चुक मोठा आघात पोहचवु शकते याला नाकारता येत नाही आणि याचे दुःख संपूर्ण परिवाराला भोगावे लागते.

गणेश विसर्जनाच्या निमित्ताने हेच सांगु इच्छितो की बाप्पांना निरोप देतांना गणेश विसर्जनाची प्रक्रीया सांभाळून करावी.त्याचप्रमाणे “निर्माल्य” तलाव, विहीर, नदी यामध्ये न टाकता प्रशासनाने निर्माल्याची व्यवस्था ज्या ठिकाणी केली आहे त्याठिकाणीच टाकावे.यामुळे प्रदूषणावर आवर घातला येईल व पाणी दुषित होण्यापासुन वाचेल.सोबतच जलचर प्राण्यांचे प्राणसुध्दा वाचेल.अशाप्रकारे संपूर्ण काळजी गणेश भक्तांनी घेणे आवश्यक आहे.गणपती बाप्पा आपल्या घरी दरवर्षी येणार.कारण गणेश विसर्जन करतांना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!असा जयघोष करून बाप्पाचे आपण विसर्जन करतो.परंतु गणेश विसर्जनाच्या निमित्ताने गणेश भक्तांनी आपल्या परिसरात एकतरी वृक्ष लावुन गणरायाला निरोप द्यावा.यामुळे गुरांना चारा सर्वांना शुद्ध हवा व ऑक्सिजन मिळण्यास मोठी मदत होईल.कारण आज कोणत्या ना कोणत्या पद्धतीने वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे.                                                   

“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” गणपती बाप्पा मोरया!!

रमेश कृष्णराव लांजेवार

मो.नं.9921690779, नागपूर