महाड दादली पुलावरून आत्महत्या केलेल्या अज्ञात इसमाचे मृतदेह दासगाव सावित्री नदीपात्रात सापडले…

सचिन पवार

कोकण ब्युरो चीफ

मो: 8080092301

 महाड :-रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दिनांक 23 सप्टेंबर शनिवार रोजी पाच दिवसाचे गणपती विसर्जन झाल्यानंतर मयत विनायक विश्वनाथ खोपकर वय वर्ष 34 राहणार दादली यांनी दादली पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती. यां घटनेची खबर महाड तालुक्यात समजतात महाड पोलीस तसेच आपदा मित्र यांनी शोध मोहीम हाताळली परंतु सदर व्यक्तीचे मृतदेह त्यांना सापडले नाही परंतु त्यांनी शोध मोहीम थांबवली नाही दोन ते तीन दिवस मयत यांचा शोध घेऊन आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी वार सोमवार रोजी दासगाव येथे सावित्री नदीपात्रात सदर व्यक्तीचे मृतदेह आढळून आले दासगांव मधील स्थानिकांनी व अपदा मित्र -अभिताभ जाधव , नागरी संरक्षण दलाचे सदस्य – संकेत कर्जावकर . राहुल उकिरडे यांच्या सहकार्याने आज अखेर मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.

महाड सावित्री नंदी पात्रात मयत इसम विनायक खोपकर यांनी आत्महत्या कां केली यांचा पुढील तपास महाड शहर चे सह पोलीस निरीक्षक श्री लांगे साहेब व पोलीस कॉन्स्टेबल एस डी भंडारी हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here