मनोरुग्ण संगोपन केंद्रातून एकीचे पलायन
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
नेरळ: दिनांक ०९.९.२०२४ रोजी शंकरममा यल्लाप्पा पुजारी वय ३९ वर्षे ही मनोरुग्ण महिला नेरळ येथील आशीर्वाद संगोपन केंद्रामधून हरवल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाणे येथे ५१/२०२४ रोजी नोंद करण्यात आली आहे. तिची उंची ५ फुट, अंगाने सडपातळ, बॉयकट अंगात काळा व ब्राऊन रंगाचा गाऊन परिधान करून कोणालाही न सांगता निघून गेली आहे. नेरळ पोलिस शोध घेत असून अध्याप सापडून आली नाही. शंकरममा हिच्या बाबत जर कोणास काही माहिती असेल तर त्यांनी नेरळ पोलीस हवालदार एम.खंडागळे मोबाईल क्रमाक ९९२२७०३९९९ किवां प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे मो.क्र. ८९७५७५८८२८ यांच्याशी संपर्क करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.