संवत्सर येथील11 खेळाडूंची जिल्हा पातळीवर निवड.

10

संवत्सर येथील11 खेळाडूंची जिल्हा पातळीवर निवड.

तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत 11.विद्यार्थी यशस्वी.

दैनिक मीडिया वार्ता न्यूज.
अहिल्यानगर:कोपरगाव.
सुनील भालेराव.
9370127037

दि.26.9.25. रोजी
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील जनता इंग्लिश स्कूल संवत्सर च्या 14 वर्षे व 17 वर्षे वयोगटाच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी दि.24 व 25 सप्टेंबर 2025 रोजी एस. एस. जी. एम कॉलेज कोपरगाव मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले असून 11. खेळाडूंची जिल्हा स्तरीय पातळीवर निवड झालेली आहे.
स्पर्धेतील विजेते खेळाडू व खेळ प्रकार खालीलप्रमाणे : कु.साईश्का जगताप, थाळीफेक– प्रथम क्रमांक, कु.श्रेया सांगळे, थाळीफेक व गोळाफेक– प्रथम क्रमांक, कु.मयुरी जाधव 200 मी.धावणे– प्रथम क्रमांक, कु.श्रुतिका वलटे, भालाफेक –प्रथम क्रमांक, कु.समीक्षा सोनवणे, 200 मी व 400 मी. धावणे– प्रथम क्रमांक, कु.प्रतीक्षा सोनवणे, 100 मी धावणे,प्रथम क्रमांक व 200 मी.धावणे द्वितीय क्रमांक,शुभम मोरे, गोळाफेक –प्रथम क्रमांक,कु.तन्वी आगवन, कु.शुभांगी भालेराव, कु.समीक्षा सोनवणे, कु प्रतीक्षा सोनवणे,4 बाय 100 मी.धावणे रिले संघ –प्रथम क्रमांक
वरील सर्व यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.मोरे व्ही.बी.यांचे मार्गदर्शन मिळाले.खेळाडूंनी मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल त्यांना विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटी,स्थानिक सल्लागार समिती,शाळा व्यवस्थापन समिती,शाळा व्यवस्थापन व विकास समिती च्या सर्व मान्यवर सदस्यांनी तसेच सन्माननीय मुख्याध्यापक श्री.मोरे आर. एस.सर,पर्यवेक्षक श्री.जेजुरकर व्ही.के.सर यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले व जिल्हा क्रीडा मैदानी स्पर्धेसाठी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
🔹🔹🔹