२४ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
मुंबई :- मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पनवेल येथे संपन्न झाला.
दिवाळी अंक म्हणजे मराठी साहित्याचा उत्सव. दिवाळीत हा उत्सव आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो. ती एक सांस्कृतिक परंपरा असून, हा वारसा पुढील पिढ्यांनी जपला पाहिजे, असे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद मोरे, लोकनेते माजी खासदार मा. रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या आणि संपादकांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.