श्रीराम सांस्कृतिक, सामाजिक क्रीडा मंडळ म्हसळा येथील दुर्गा मातेचे मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले दर्शन
म्हसळा: संतोष उद्धरकर.
म्हसळा:श्रीराम सांस्कृतिक, सामाजिक क्रीडा मंडळ नवरात्रोत्सव कार्यक्रम ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांनी भेट देऊन मां दुर्गा मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला. याप्रसंगी त्यांच्या समवेत नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष सौरव पोतदार, उपाध्यक्ष महेंद्र करडे, खजिनदार, शैलेश पटेल, सचिव शिरीष समेळ, मंडळाचे सदस्य तथा म्हसळा नगरपंचायत उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे, कार्यकारिणी सदस्य योगेश करडे,यतीन करडे,अनिल पोतदार, निलेश करडे, शशिकांत शिर्के त्यांच प्रमाणे मंडळाचे सर्व सन्मानीननिय सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी गौरी पोतदार भविका पोतदार, कल्पिता करडे, टीना करडे,वनिता समेळ ,छाया करडे,बनकर काकी , सुरेखा करडे
या महिलांच्या हस्ते नाम.अदिती ताईंचा शाल ,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना महिला महाआरतीचे निमंत्रण पत्रिका सन्मानपूर्वक देण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष समीर बनकर, जि. प. चे माजी कृषी सभापती बबन मनवे, जिल्हा चिटणीस महादेव पाटील, निलेश मांदाडकर, लहू म्हात्रे,शाहिद उकये, आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना नामदार तटकरे यांनी सांगितले कि, नवरात्रोत्सव सोहळा हिंदू समाजासाठी विधायक, धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा असून आज मला आपण याठिकाणी दिलेल्या मानसन्मानामुळे मी उपकृत झाले असून या मंडळाचे जेवढे आभार आणि कौतुक मानावे तेवढे कमी आहेत.
या आनंदोत्सवात एक अद्वितीय आनंदाची भर पडली असून खास. सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नाने चैत्र महिन्यात संपन्न होणाऱ्या श्री धावीर देव महाराजांच्या यात्रेकरीता श्री धावीर महाराज यांच्या पालखी सोहळ्यास पोलिसांची मानवनंदना मिळण्यास सुरुवात झाली आहे.