Home latest News पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती उत्साहात संपन्न.
पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती उत्साहात संपन्न.
संवत्सर येथे अभिवादन सभा उत्साहात संपन्न.
दैनिक मीडिया वार्ता अहिल्यानगर:कोपरगाव.
सुनील भालेराव.
9370127037
दि.26.9.25. रोजी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील संवत्सर या ठिकाणी जनता इंग्लिश स्कूल येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती अभिवादन सभा विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य मा.श्री.राजेश(आबा) नामदेवरावजी परजणे साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि.गौतमनगर,कोळपेवाडीचे कार्यकारी संचालक मा.श्री.सोमनाथ शिवाजीराव बोरनारे साहेब तसेच प्रमूख व्याख्याते म्हणून आर. बी.एन.बी. कॉलेज श्रीरामपूर चे सेवानिवृत्त प्राध्यापक मा.प्रा.श्री.लक्ष्मणराव पुंजाजी कोल्हे सर उपस्थित होते.सभेच्या आरंभी विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री.मोरे आर. एस.यांनी उपस्थित मान्यवर अतिथींचा परिचय करून दिला तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.जेजुरकर व्ही.के.यांनी शाखा अहवालाचे वाचन केले. कु.आलिया सय्यद व कार्तिकी पवार या विद्यार्थिनींनी कर्मवीर अण्णा व रयत माऊली
सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचेविषयी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे तसेच शैक्षणिक वर्ष 2024/ 25 मध्ये इ.10 वी एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत विद्यालयात प्रथम तीन क्रमांक प्राप्त,विषयात प्रथम क्रमांक प्राप्त,क्रीडा स्पर्धेत सुयश संपादन प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना थोर देणगीदार यांनी ठेवलेल्या ठेव रक्कमेच्या व्याजातून येणाऱ्या रोख स्वरूपातील रक्कमेची पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.
प्रमुख अतिथी
मा.श्री.सोमनाथ बोरनारे साहेब यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता व तिचे महत्त्व व सध्याची नोकरीची भीषण अवस्था याविषयी सहज सोप्या शब्दात मार्गदर्शन केले.तर सभेचे प्रमुख व्याख्याते मा.प्रा.श्री.लक्ष्मणराव पुंजाजी कोल्हे सर यांनी आपल्या अमोघ व रसाळ वाणीच्या सहाय्याने कर्मवीरांचा जीवनपट उलगडून अण्णांची व रयत माऊली सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची शिक्षणाविषयीच्या त्यागाची विचारधारा सांगत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
अध्यक्ष मा.श्री.राजेश(आबा) नामदेवरावजी परजणे साहेब यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयात थोर शिक्षण व समाजसुधारक यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्या पाठीमागील उद्देश ध्यानात घेऊन व त्यातून योग्य बोध घेवून आपली शैक्षणिक प्रगती साधावी असे प्रतिपादन केले.विद्यार्थिनींनी सादर केलेल्या उत्कृष्ठ मनोगताबद्दल समाधान व्यक्त करून त्यांची इयत्ता 10 वी पर्यंतची संपुर्ण शैक्षणिक जबाबदारी व खर्च स्वतः घेणार असल्याचे जाहीर केले. अभिवादन सभेस स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि.गौतमनगर,
कोळपेवाडीचे संचालक मा.श्री.बाळासाहेब आप्पासाहेब बारहाते,
मा.श्री.दिलीपराव आनंदराव बोरनारे,
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि.कोपरगाव चे संचालक मा.श्री.ज्ञानेश्वर बापू परजणे,
संजीवनी सहकारी पतसंस्था लि.कोपरगावचे चेअरमन मा.श्री.राजेंद्र परजणे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत भागवत लोखंडे,
स्थानिक सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य
मा.श्री.मधुकरराव काशिनाथ साबळे,श्री.अशोकराव भाऊसाहेब लोहकणे,श्री.चंद्रशेखर यशवंत देशमुख,श्री.संजय मुरलीधर भाकरे,श्री.गोवर्धन बाबासाहेब परजणे, श्री.भाऊसाहेब जयवंतराव परजणे,श्री. दिलीपराव दिनकरराव आबक,माजी केंद्रप्रमुख मा.श्री.दिलीपराव ढेपले साहेब,ग्रामपंचायत सदस्य मा.श्री.महेश भाऊ परजणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.खंडूजी फेफाळे,
सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.संजय काळे,मा.श्री.भरत तात्या बोरनारे,शिक्षणप्रेमी नागरिक मा. श्री.लक्ष्मणराव साबळे,विद्यालयाचे थोर देणगीदार, हितचिंतक,पंचक्रोशीतील ग्रामस्थ,सन्माननीय मुख्याध्यापक श्री.मोरे आर.एस.,पर्यवेक्षक श्री.जेजुरकर व्ही.के.तसेच सर्व सेवक वृंद उपस्थित होते.अभिवादन सभेचे सूत्रसंचालन श्री.खेताडे सर व श्रीमती नागरे मॅडम आणि आभार श्री.शिंदे सर यांनी मानले.
सोमवार दि. 22 सप्टेंबर रोजी कर्मवीर आण्णांच्या 138 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आकर्षक व शोभिवंत सजावट केलेल्या कर्मवीर रथाचे पूजन स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य, मा.श्री.राजेश(आबा) नामदेवरावजी परजणे तसेच मा.श्री.बाळासाहेब आप्पासाहेब बारहाते,मा.श्री.दिलीपराव आनंदराव बोरनारे,स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मा.श्री.सचिन काळे, गुरुकुल पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.निलेश कर्पे,माजी केंद्रप्रमुख मा.श्री. दिलीपराव ढेपले,श्री.सचिन भाकरे, माजी वरिष्ठ लेखनिक मा.श्री. मारुतीराव लोखंडे,शाळा व्यवस्थापन समिती,शाळा व्यवस्थापन व विकास समिती ,पालक शिक्षक संघ,गुरुकुल पालक शिक्षक संघ, माता पालक संघ चे सर्व सदस्य,विद्यालयाचे थोर देणगीदार,शिक्षणप्रेमी नागरिक व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले.यानंतर संवत्सर गावातून कर्मवीर रथाची ढोल ताशांच्या गजरात व विद्यार्थ्यांच्या घोषणांच्या निनादात भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकी दरम्यान गावातील महिलांनी कर्मवीर रथाचे भावपूर्ण अंतःकरणाने पूजन केले.मिरवणुकीच्या अखेरीस गावातील शनी मंदिर पटांगणावर विद्यार्थ्यांनी लाठी-काठी,दांडिया नृत्य,आदिवासी नृत्य,लेझीम चे उपस्थित ग्रामस्थांसमोर उत्कृष्टरीतीने सादरीकरण केले. उपस्थितांनी देखील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरभरून प्रतिसाद दिला. याप्रसंगी माजी केंद्रप्रमुख मा.श्री. दिलीपराव ढेपले साहेब यांनी ग्रामस्थांच्या वतीने सर्व विद्यार्थी व शिक्षक बंधू- भगिनी यांनी तयार केलेल्या कर्मवीर रथाचे व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाचे कौतुक करून सर्वांना कर्मवीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री.मोरे आर.एस.सर यांनी सर्वांचे आभार मानले.
यानंतर मिरवणुक रथ विद्यालयात पोहोचल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक स्टाफच्या वतीने शालेय प्रांगणात मिष्ठान्न भोजन देण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली.
🔹🔹🔹