महाकाली मंदिरासमोर 51 फूट उंच असलेल्या महाकाली महोत्सवाच्या ध्वजाचे ध्वजारोहण

14

महाकाली मंदिरासमोर 51 फूट उंच असलेल्या महाकाली महोत्सवाच्या ध्वजाचे ध्वजारोहण

✍🏻पूजा ढोके✍🏻
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मो. 93073 74022

चंद्रपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की चंद्रपूर ची आराग्य दैवत श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त महाकाली मंदिरासमोर 51 फूट उंच असलेल्या महाकाली महोत्सवाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण सोहळ्यास आमदार श्री. किर्तिकुमार भांगडिया यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच श्री माता महाकाली ट्रस्टच्या पदाधिकार्यांसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या निमित्ताने मंदिर परिसर सुंदर रोषणाईने सजविण्यात आला असून संपूर्ण परिसर उत्सवी वातावरणाने उजळून निघाला आहे. पाच दिवस चालणार्या या महोत्सवात विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून स्थानिक कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. यासोबतच महाकाली महोत्सवावर आधारित चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.