चित्रकार वरद खुशाली विलास यांचे चित्र कर्नाटक चित्रकला परिषद गॅलरीमध्ये झळकणार.

25

चित्रकार वरद खुशाली विलास यांचे चित्र कर्नाटक चित्रकला परिषद गॅलरीमध्ये झळकणार.

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747

मुंबई :- शायनी कलर आयोजित तिसरी राष्ट्रीय स्पर्धा आणि प्रदर्शनामध्ये सुप्रसिद्ध चित्रकार विक्रांत शितोळे, आदित्य चारी, प्रफुल सावंत, एम.जी. दोडामणी आणि रश्मी सोनी या परिक्षकांकडून निवडण्यात आलेल्या चित्रांमध्ये *युवा चित्रकार वरद खुशाली विलास* यांचे एक व्यक्तिचित्र निवडण्यात आले आहे.
‘शहरांच्या पलीकडे’ या चित्रांच्या स्वः सिरीज मधील आदिवासी जीवन शैली जगत असलेल्या सुंदर तरुणीचे चित्र पाहताना, निसर्ग सहवासातील सौंदर्यदृष्टीचे प्रतीक उभे राहते. तरुणीने दातात पकडलेली गवताची पात, वार्‍याच्या झुलुकेने चेहऱ्याचे सौंदर्य खुलवणाऱ्या केसांच्या बटा आणि चोळीच्या वर पारंपारिक मण्यांच्या माळांनी खुलून दिसणारी परिपूर्ण सौंदर्यवती जणू मोहात पाडत आहे.
शहरांच्या पलीकडे असलेल्या वनवासी जीवनशैलीची उत्सुकता आणि सौंदर्य कॅनव्हासवर चित्रकार वरद खुशाली विलास याने आपल्या वेगळ्याच शैलीतून चितारले आहे.
सदर चित्र प्रदर्शन कर्नाटक चित्रकला परिषद, बंगलोर गॅलरीमध्ये दिनांक 25 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.