Home latest News विद्यान प्रयोग उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते.
विद्यान प्रयोग उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते.
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
मुंबई :- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, महान समाजसुधारक आणि शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंती सोहळ्यानिमित्त तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय, फुंदे आणि वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, महाळुंगे विभाग फुंदे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
यावेळी आमदार पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून नवनवीन तंत्रज्ञानात प्रयोगशील राहण्याचं मार्गदर्शन केलं तसंच थोर शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांच्या कार्याची जाणीव करून दिली.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही करण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग तसेच विद्यार्थी आणि पालक वर्ग ही या कार्यक्रमाला उपस्थित होते.