ग्रंथपाल ज्योती म्हात्रे यांचा स्तुत्य उपक्रम – म्हाडा कॉलनीत जेष्ठ नागरिकांसाठी वाचन कट्टा

12

ग्रंथपाल ज्योती म्हात्रे यांचा स्तुत्य उपक्रम – म्हाडा कॉलनीत जेष्ठ नागरिकांसाठी वाचन कट्टा

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ ज्योती म्हात्रे यांनी लक्ष्मीबाग म्हाडा कॉलनी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचन कट्ट्याचे उद्घाटन केले. उपस्थित जेष्ठ नागरिकांचे सौ ज्योती म्हात्रे यांनी पुष्प देऊन स्वागत केले. यामध्ये 25 पुस्तके देऊन ती वाचून झाल्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा नवीन पुस्तके त्यांना देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिक वर्गामध्ये सगळे खुश होऊन आनंद व्यक्त केला. घरपोच सेवा मिळाल्याने सगळे ज्येष्ठ नागरिक आनंदित झाले व ज्योती म्हात्रे यांचे त्यांनी या उपक्रमाबद्दल हार्दिक स्वागत केले. कथा, कादंबऱ्या व धार्मिक ग्रंथ असे ग्रंथ वाचायला मिळणार असल्याने ज्येष्ठ नागरिकात आनंद निर्माण झाला व वाचनाची आवड पुन्हा एकदा जोपासता येईल असेही सर्व ज्येष्ठ नागरिकांनी भावना व्यक्त केली.