धम्मचक्र प्रवर्तन दिन आणी दसरा सामाजिक उपक्रमा द्वारा साजरा.

55

धम्मचक्र प्रवर्तन दिन आणी दसरा सामाजिक उपक्रमा द्वारा साजरा.

भोजनदान करताना सामाजिक कार्यकर्ते

पल्लवी मेश्राम प्रतिनिधी
नागपुर:- करोना विषाणूच्या सावटामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन आणी दसरा नागपुरच्या सुगत नगर चौक परीसरात विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार पल्लवी मेश्राम, बबिता मेश्राम, समाज सेविका निशा खान यांनी आयोजित केलेल्या भोजन दानाचा हजारो लोकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यश साठी तुलसी रामजी, संजय मेश्राम, पूजा मेश्राम, मुबिन खान, शाकिर भाई, किरण यादव, आणी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासुन यापुढे ही अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येणार असे सांगितले.