पुन्हा एकदा हादरले हाथरस,अल्पवयीन मुलांनी केला 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार.

47

पुन्हा एकदा हादरले हाथरस,अल्पवयीन मुलांनी केला 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार. 

हाथरस:- मध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान आता हाथरस पुन्हा एकदा हादरले आहे. अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार  झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हाथरसमध्ये अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांचे वय 9 आणि 12 वर्ष असल्याचं सांगण्यात आलं आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिल्यानंतर स्थानिक हाथरस पोलीस ठाण्यात बलात्काराच्या  घटनेची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेली दोन्ही मुलं एकाच गावातील आहेत. कायद्यातील तरतुदींनुसार गुन्ह्याची नोंद करून घेण्यात आली आहे. पीडित मुलीस वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून, पुढील कारवाई सुरू आहे.