पाण्याच्या खड्ड्यात बुडून बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यू.

58

पाण्याच्या खड्ड्यात बुडून बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यू.


जालना:-  जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कुरण-वाळकेश्वर रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून सख्ख्या बहिण-भावांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी 5 वाजता घडली. आदेश संजय उनवणे 12 व सगुना संजय उनवणे 8 असे मृत्यू झाल्यांची नावे आहेत.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील शेत मजुर संजय उनवणे हे अंबड तालुक्यातील वाळकेश्वर येथे आपल्या पत्नी व दोन मुलांसह काही महिन्यापुर्वी उदरनिर्वाह करण्यासाठी आले होते. आज वाळकेश्वर परिसरात शेतीचे काम करण्यासाठी संजय उनवणे आपल्या कुटूंबासोबत गेले होते. सायंकाळी 5 च्या सुमारास आदेश आणि सगुना घराकडे परतत असतांना कुरण -वाळेकश्वर रस्त्याच्या बाजुला असलेल्या एका खड्ड्यातील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
मुलगी सगुना ही पाण्यावर तरंगतांना निर्दशनास येताच गावकऱ्यांनी मयत मुलांचे वडील संजय उनवणे यांना कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. यानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढले.