*अर्हेर-नवरगांव रेती घाटावरून अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा*

:- दोषींवर कारवाई करून MSMC व खाजगी रेती साठा वेगवेगळा करण्याबाबत
ब्रम्हपुरी मनसे आक्रमक

✒️क्रिष्णा वैद्य✒️
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी:-
तालुक्यात अवैध रेती तस्करीचे सर्वत्र थैमान सुरु असतांना राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी लोकहित बाजूला सारत, स्व:हीत जोपासत असल्याचे नागरिकांना भासत असतांना समाजकार्य प्रथम मानणारे ब्रम्हपुरी मनसे तालुकाध्यक्ष श्री सुरजभाऊ शेंडे यांनी जनहितार्थ पुढाकार घेत अवैध रेती तस्करांवर आळा घालण्यासाठी चंग बांधत तहसीलदार ब्रम्हपुरी यांना म.न.से शिष्टमंडळासह निवेदन देत तालुक्यातील मौजा अर्हेर -नवरगांव नदी(चिकलधोकळा ) घाटावरील मागील दोन दिवसापासून रात्रोच्या सुमारास पोकलॅण्डच्या सहाय्याने नदी पात्रातील रेती अवैधरित्या मोठ्या प्रमाणात उत्खनन करून रात्रभर ट्रॅक्टरने डम्पींग करून हॉयवा ट्रकने रोजरोषपणे वाहतुक केली जात असल्याचे निवेदनाद्वारे कळवीत.

सदर घाटावरील गट क्र .८१ ९ / १ वरील श्री.अनिरूध्द हरिहर मंडल , नागपूर व गट क्र .८१ ९ / २ वर महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ ( MSMC ) नागपूर यांची रेती साठवणूक केलेली आहे . मात्र दोन्ही गटातील रेती साठा एकत्रित असल्याने शासनाचा व खाजगी रेती साठा किती हे लक्षात येत नसल्याने रेती चोरीच्या प्रमाणात वाढ होत असून शासनाचा लाखोचा
महसूल बूडत आहे .

करिता सदर दोन्ही गटातील रेती साठा वेगवेगळे करून तेथील होणाऱ्या चोरीला आळा घालावा व अर्हेर नवरगांव नदी घाटावरून रात्रोच्या सुमारास पोकलँड , जे.सी.पी.च्या सहाय्याने सरासरी ५० ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या होत असलेले रेती उत्खनन तात्काळ बंद करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल
असा ईशारा मनसे तालुका प्रमुख श्री सुरजभाऊ शेंडे यांनी तहसीलदार ब्रम्हपुरी यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे.

सोबतच दि.२४/१०/२१ च्या रात्रो च्या सुमारास झालेल्या अवैध रेती उत्खननाची छायचित्र निवेदनासोबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केले आहेत. तर निवेदनाच्या
प्रतिलिपी : मा . आयुक्त नागपूर विभाग , नागपूर व मा . जिल्हाधिकारी , चंद्रपूर. उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना दिले. सदर निवेदन देतांना ब्रम्हपुरी तालुका मनसे पदाधिकारी तालुका उपाध्यक्ष मंगेश फटींग, हरिष हटवार, नितीन पोहरे, शहर अध्यक्ष दिपक मेहर,सुरज करंबे , नितीन विकार, पवन गायगवळी व इतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here