*बामणवाडा ग्रामपंचायतीच्या अनेक सदस्यांना माहिती न देता हिटलर शाहिने ग्रामसभेत देशी दारूला नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सरपंच्या भारती पाल व ग्रामसेवक कावटाळकर यांच्या प्रयत्नाला सदस्यांचा तीव्र विरोध*

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा तालुक्यातील बामणवाडा यथे नऊ सदस्यांची कमिटी असून अनेक सदस्यांना माहिती न देता ग्रामसेवकांना हाताशी धरून ग्रामसभेत सरकार मान्य देशी दारूला नाहरकत प्रमाणपत्र देणे असा विषय क्र. 2 वर ठेवण्यात आला असल्याने अनेक ग्रामपंचायत चे सदस्य संतापले असून या प्रकारचा तीव्र निषेध बामणवाडा ग्रामपंचायत च्या वार्ड नं.१ च्या सदस्या सुजाता मेश्राम, वॉर्ड क्रं.३ च्या सदस्या, भारती करमनकर, वार्ड नं.१ च्या सदस्या समिश्रा झाडे, वार्ड नं.२ च्या सदस्या मंजुषा कोडापे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सर्वानंद वाघमारे, राकेश वाघमारे, यांनी केला आहे.
दारुभट्टी मुळे महिलांचे संसार उघड्यावर येतील, शाळकरी मुला- मुलींना नाहक त्रास होईल, गावाची शांती भंग होईल अश्या कानपिचक्या दिल्या असून असून पैशाच्या लालसेपोटी असे घातक निर्णय न घेण्याबाबत सल्ला ही दिला आहे. देशी दारू भट्टी ला नाहरकत प्रमाणपत्र देण्याबाबत चा विषय वगळण्यात यावा अशी मागणी विद्यमान सदस्यांनी निवेदनातून केली आहे.
मात्र हिटलर शाहीचा आव आणणाऱ्या सरपंच्या भारती पाल निवेदनाची दखल घेऊन सदर विषय वगळतील काय असा प्रश्न नागरिकांना पडलेला असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








