सीडीआर मागवायला माझी मुलगी गुन्हेगार आहे का ?; मलिक यांचा वानखेडेंना सवाल

47

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. :- 9768545422

मुंबई : आर्यन ड्रग्स प्रकरणात रोज नवे नवे खुलासे होत आहेत. या प्रकणावरून मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातही जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर फोन टॅपिंगचा आरोप केला आहे. ‘समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून माझ्या मुलीचा सीडीआर (काॅल डिटेल रेकाॅर्ड) मागितला. सीडीआर हा गुन्हेगारांचा मागवला जातो. सीडीआर मागवायला माझी मुलगी गु्न्हेगार आहे का, असा संतप्त सवाल अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

मंत्री नवाब मलिक पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी मलिकांनी वानखेडे यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप केला आहे. पुढे म्हणाले,’काही लोकांचा आरोप आहे की, मी वानखेडे यांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप करतोय. कोणाच्या खासगी जीवनात जाण्याची भुमिका नाही. एखादा व्यक्ती धर्मांतर करून दुहेरी लाभ घेत असले तर त्याचा उल्लेख केला पाहिजे., असे मलिक म्हणाले.

वानखेडे यांनी धर्म बदलला नसल्याचा आणि जन्माचा दाखला खोटा असल्याचा दावा केला असला, तर त्यांनी आपला खरा जन्माचा दाखला दाखवून सत्य समोर आणावे, असे आव्हान देखील मलिक यांनी वानखेडे यांना केले.