कोरपना तालुक्यातील शेतकऱ्याच्या कापसाच्या पिकावर कोरगुलाबी बोंड अळी चे साम्राज्य
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची प्रशासनाला मदतीची हाक

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची प्रशासनाला मदतीची हाक
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
8208166961
कोरपना : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही कोरपना तालुक्यातील शेतकऱ्याने आपआपल्या शेतात मोठ्या आशेने कापसाची पेरणी केली होती पण कोरपना तालुक्यातील पुष्कळ श्या गावाच्या शेतातील कापसावर कोरगुलाबी बोंड अळी ने आपले साम्राज्य पसरवून पूर्ण शेतातील पिकावर कब्जा केलेला आणि यामुळे संपूर्ण पिकाचे नुकसान झाले आहे. आणि जवळपास कोरपना तालुक्यातील आजूबाजूच्या सम्पूर्ण शेतीची अशीच परिस्थिती झालेली आहे अशा पुर्ण शेतात हीच स्तीती झालेली आहे आणि त्यामुळे कोरपना तालुक्यातील सर्वच शेतकरी त्रस्त आहे. म्हणून कोरपना तालुक्यातील शेतकरी आता हवालदिल झालेल्या शेतकऱ्याकडे शासन प्रशासनाने लक्ष देऊन व त्या पिकांची पाहणी करून त्याचावर काही उपाय योजना करावी व नुकसान भरपाई म्हणून शासनाने आर्थिक मदत करावी अशी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे .