देवळी येथील एका व्यवसायिकाच्या राहत्या घरी शॉर्ट सर्किटमुळे आग

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
देवळी २६/१०/२१
येथील पोलीस स्टेशन समोरील गल्लीत व्यावसायिकाच्या राहत्या घरी शॉर्ट सर्किट ने आग लागून व्यवसायिकाचे नुकसान झाले. घटनावेळी घरी कुणीच नसल्याने जीवीत हानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन समोरील पांडेजी महाराज गल्ली मध्ये मनिष अग्रवाल यांचे वास्तव्य आहे. मंगळवारी सहकुटुंब ते बाहेरगावी असतांना, रात्री 8 वाजता त्यांच्या घरातुन धूर निघतांना शेजाऱ्याना दिसून आले. आगीचा लोट दिसल्यावर तातडीने देवळी नगर परिषद अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.घराचे कुलूप तोडून अग्निशमन दलाने त्वरित आग आटोक्यात आणली आहे.