महाकाली मंदिराच्या जिर्णोधारात येणा-र्या अडचणी दुर करण्याच्या दिशेने प्रयत्न करा – आ. किशोर जोरगेवार

49

महाकाली मंदिराच्या जिर्णोधारात येणा-र्या अडचणी दुर करण्याच्या दिशेने प्रयत्न करा – आ. किशोर जोरगेवार

महाकाली मंदिराच्या जिर्णोधारात येणा-र्या अडचणी दुर करण्याच्या दिशेने प्रयत्न करा - आ. किशोर जोरगेवार

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

•केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
•नागपूर ते चंद्रपूर मेट्रो प्रकल्प लवकर सुरु करण्याची मागणी
चंद्रपूर : 25 ऑक्टोंबर
चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराच्या जिर्णोधाराच्या कामात येत असलेली पुरातत्व विभागाची अडचण दुर करण्यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करण्याची मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे. सोबतच नियोजित नागपूर ते चंद्रपूर मेट्रो प्रकल्पाला लवकर सुरवात करण्यात यावी, वर्धा नदीवर पुलाची उंची वाढविण्यासाठी 90 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, चंद्रपूर येथील वरोरा नाका उड्डाणपूल – सावरकर चैक – बंगाली कॅंम्प ते एम.ई.एल ला जाणाऱ्या रेल्वे लाईन पर्यंत उड्डाणपूलाचे बांधकाम करण्यात यावे. आदि मागण्या यावेळी आ. जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केल्या आहे. यावेळी आ.जोरगेवार यांनी ना. नितीन गडकरी यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्यात. यावेळी माजी नगर सेवक बलराम डोडानी आणि अजय जयस्वाल यांची उपस्थिती होती. चंद्रपूरकरांची आराध्य दैवत असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या माता महाकाली मंदिराचा जिर्णोधार करण्याचा संकल्प आ. जोरगेवार यांनी केला आहे. सदर जिर्णोधारासाठी दुस-या टप्यात 75 कोटी रुपये देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे. तसेच तिसर्या टप्यातही निधी उपलब्ध करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. मात्र सदर विकास कामात पुरातत्व विभागाची अडचण येत आहे. हे विकासकामे करताना पुरातन मंदिराच्या मूळ रचनेत कोणताही बदल केला जाणार नाही. असे असतांनाही पुरातत्व विभागाची अडचण येत असल्याने नागरिक व भाविकांमध्ये असंतोषाची भावना आहे. त्यामुळे आपण याकडे लक्ष देत केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांसह संबधीत अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून सदर अडचण दुर करावी अशी मागणी यावेळी आ. जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे. विदर्भात ड्रीम प्रोजेक्ट ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करण्यात आलेला आहे. विदर्भाचा सर्वांगीण विकास व्हावा या एकमेव उद्देशाने या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात करण्यात येत आहे. या प्रकल्पात विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वडसा, गोंदिया तसेच वर्धा, चंद्रपूर आदी शहरांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला आहे. याचा फायदा विदर्भासह औद्योगिक नगरी चंद्रपूर येथील प्रवाशांना होईल. चंद्रपूरातून मोठ्या संख्येने विविध कामांसाठी नागपूरला जाणाऱ्या रोजच्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरु झाल्यास खाजगी वाहने आणि वाहतूक सेवांवरील अवलंबित्व कमी होईल. तसेच वाहतूक कोंडी, रस्ते अपघात आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होईल. तसेच यामुळे शेजारच्या जिल्ह्यातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार सर्व घटकांची प्रवासाची उत्तम सोय होणार आहे. ही बाब लक्षात घेता सदर मेट्रो सेवा सुरु करण्याच्या दिशेने नियोजन करुन यात येणा-र्या अडचणी दुर करण्यासाठी संबधित विभागाची बैठक आयोजित करण्यात यावी तसेच हा प्रकल्प लवकर सुरु करण्यात यावा अशी मागणी आ. जोरगेवार यांनी केली आहे.
चंद्रपूर तालुक्यामध्ये मागील काही महिन्याआधी सततच्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत वर्धा नदीवरील पूल ३७२ तास पाण्याखाली राहीला होता. त्यामुळे हा पूल क्षतिग्रस्त झाला असुन या ठिकाणी उंच पुल बांधण्यासाठी 90 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, चंद्रपूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० हा शहराच्या आतून जाणारा असून हा महामार्ग चंद्रपूर ते बल्लारशाह व चंद्रपूर ते गडचिरोली या महत्वपूर्ण शहरांना जोडणारा आहे. चंद्रपूर शहर हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथील जनसंख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे महामार्गाला लागून बऱ्याच वसाहती निर्माण झालेल्या आहे. तसेच चंद्रपूर शहरातील नवीन वैद्यकीय महाविद्यालय याच महामार्गावर आहे. त्यामुळे ह्या महामार्गावर जड वाहतूकीची प्रमाण अधिक आहे. हि बाब लक्षात घेता येथील वरोरा नाका उड्डाणपूल – सावरकर चौक – बंगाली कॅंम्प ते एम.ई.एलला जाणाऱ्या रेल्वे लाईन पर्यंत उड्डाणपूलाचे बांधकाम करण्यात यावे. अशी मागणी आ. जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.