मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास विदर्भ, मराठवाड्यातील राज्यमहामार्गावरील वाहतूक बंद करू – सकल मराठा बांधव (पाच तालुक्यातील सकल मराठा समाजाचा पत्रकारपरिषेत शासनाला गंभीर इशारा)

52
मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास विदर्भ, मराठवाड्यातील राज्यमहामार्गावरील वाहतूक बंद करू - सकल मराठा बांधव (पाच तालुक्यातील सकल मराठा समाजाचा पत्रकारपरिषेत शासनाला गंभीर इशारा)

मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास विदर्भ, मराठवाड्यातील राज्यमहामार्गावरील वाहतूक बंद करू – सकल मराठा बांधव

(पाच तालुक्यातील सकल मराठा समाजाचा पत्रकारपरिषेत शासनाला गंभीर इशारा)

मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास विदर्भ, मराठवाड्यातील राज्यमहामार्गावरील वाहतूक बंद करू - सकल मराठा बांधव (पाच तालुक्यातील सकल मराठा समाजाचा पत्रकारपरिषेत शासनाला गंभीर इशारा)

✒️ बबलू भालेराव ✒️ तालुका प्रतिनिधी,उमरखेड मो.9637107518

उमरखेड :- (दि. 26 ऑक्टोंबर)
सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी सरकारला 40 दिवसांचा अवधी दिला होता तसेच रक्तरणजित पत्र सर्व आमदार खासदारांना पाठवून सुद्धा सरकारने वेळकाढू धोरण अवलबींत आरक्षण दिले नाही त्यामुळे उमरखेड, पुसद महागांव व मराठवाड्यातील हदगांव आणि हिमायतनगर तालुक्यातील सकल मराठा समाज शासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकारपरीषदेत सकल मराठा समन्वयकांनी व उपोषणकर्त्यानी दिला आहे.

दि 26 आक्टोबर पासुन सर्वपक्षीय नेत्यानां गावबंदी करणार असल्याचे तसेच
पाचही तालुक्यातील मराठा समाज 28 तारखेपासून आमरण उपोषण करणार असल्याचे आणि 30 तारखेपासून राज्यमहामार्ग वाहतुक बंद करणार असून देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांना सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून 5 लाख पत्र पाठवुन आपल्या भावना त्यांच्या पर्यन्त पोहचविणार आहे.त्यामुळे हे आंदोलन करतांनां आरोग्य सेवा वगळून बाकी सर्व वाहतुक बंद करण्याचा इशारा यावेळी पाचही तालुक्यातील उपस्थित मराठा समाजाचे कार्यकर्ते, समन्वयकांनी दिला.

उमरखेड तहसिलच्या प्रांगणात सकल मराठा समाजाच्या 5 युवकांनी 13 दिवस बेमुदत आमरण उपोषण केले होते त्यानंतर तालुक्यासह शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विविध आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधले होते.

मात्र राज्य शासनाने आरक्षणाचा विषय मार्गी न लावल्याने यापुढे उमरखेड,पुसद, महागांव, हदगांव,हिमायनगर येथील तालुक्यातील सकल मराठा समाजाने उग्र आंदोलनाचा इशारा दिला यावेळी मोठ्या प्रमाणात विदर्भ ,मराठवाडयातील पाच तालुक्यातील सकल मराठा समाज उपस्थीत होता.

बॉक्स:- आरक्षण संदर्भात सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेट देऊन विविध आंदोलने,रक्त रणजित पत्रे पाठवून सुद्धा यांना कुठल्याच प्रकारची आस्था मराठा असरक्षणा संदर्भात दिसत नसल्यामुळे रुग्ण सेवा सोडून ये त्या 1 तारखेला नागपूर तुळजापूर रस्ता बेमुदत बंद करणार – सचिन घाडगे (उपोषणकर्ते)