जि.प. सदस्य चितांगराव कदम यांचा राजीनामा

56
जि.प. सदस्य चितांगराव कदम यांचा राजीनामा

जि.प. सदस्य चितांगराव कदम यांचा राजीनामा

जि.प. सदस्य चितांगराव कदम यांचा राजीनामा

✒️ बबलू भालेराव ✒️तालुका प्रतिनिधी उमरखेड मो.9637107518

उमरखेड (दि. 26 ऑक्टोंबर)
मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही.. तोपर्यंत मी शिवसेना पक्षाच्या उमरखेड महागांव तालुका सहसंपर्कप्रमुख या पदावर काम करू शकत नसल्याचे ना.संजय राठोड मार्फत. मा जलसंधारण मंत्री म.रा. तथा पालकमंत्री यवतमाळ यांना लेखी पत्र देऊन राजीनामा दिला आहे.

मागील अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मागणी होत आहे.

महाराष्ट्र मध्ये बहुसंख्येने असणारा मराठा समाज आजच्या आर्थीक परिस्थितीमुळे शिक्षण व नौकरी मिळवू शकत नाही.

जास्तीत जास्त समाज अत्यल्प भुधारक झाला आहे. त्यामुळे मराठा समाजातील कुटुंबामध्ये व तरुणामध्ये असतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाचा घटक म्हणून मी ‘शिवसेना’ पक्ष जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत उमरखेड व महागांव तालुका सहसंपर्क प्रमुख पदावर पक्षाचे काम करणार नाही. असे माहिती जि.प. सदस्य चितांगराव कदम सर यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना दिली.