26 नोव्हेंबर संविधानाचं गाण..
कवी:- मिलिंद कांबळे चिंचवलकर
📲9892485349📲
होईल जीवनाचं सोन,
अन् समाजाचं हो कल्याण
राष्ट्रीय एकात्मता जपण्या
अंगीकारु संविधान ||धृ.||
जाती, रुढी, वर्ण व्यवस्था
हि मनुची विषमता,
माणसाला माणूस म्हणून
देत नाही समानता
पण संविधानांने केलायं
मानवी मुल्यांचा सन्मान ||१||
देशाची एकता, अखंडता
संविधान जोपासते,
धर्मनिरपेक्षता ओळख
जगी सार्या गाजते
जीर्ण व्यवस्था मोडून
बाळगू संविधानाची शान ||२||
चातुर्वण व्यवस्थेपायी तुम्ही
का संविधान नाकारता ?
अन्याय अत्याचार होता
मग का संविधान स्विकारता ?
न्यायासाठी फक्त तुमचं
कसं चालणार हे धोरण ||३||
संविधान देशाची शान
अन् आत्मसन्मान,
उच्च निच भेद गाढून
एकतेचं गाऊ गाण
जातीयता निर्मुंलन करुन
राहू सर्व एक समान ||४||