बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनमध्ये इंडक्शन प्रोग्राम संपन्न 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी 

मो:8830857351

चंद्रपूर, २५ नोव्हेंबर: बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या सभागृहात पाच दिवसीय प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन सर्वोदय महिला मंडळाने सीईओ भरत बजाज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्राचार्य सतीश ठोंबरे व कार्यकमाचे मुख्य आयोजक प्रा. एस. एन. विधाते व सायन्स विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

संस्थेचे व्हिजन वाचन प्रा. सीमा केले. नगराळे यांनी केले. मेकॅनिकल विभागाच्या वरिष्ठ प्रा. आरती आरेवार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व मानवी मुल्यावर प्रास्ताविकातून प्रकाश टाकला. या पाच दिवसीय इंडक्शन प्रोग्रामच्या अनुषंगाने अनेक प्राध्यापकांनी विविध विषयांच्या माध्यमातून सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रबोधन केले. यात भरत बजाज यांनी, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई व बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन, चंद्रपूरद्वारा पुरविण्यात येणाऱ्या सर्व सुविधा व परिचय करून दिला. त्यांचा विद्यार्थ्यांना होणारा फायदा यावर चर्चेद्वारे विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

प्राचार्य ठोंबरे यांनी, तंत्र शिक्षणाचे भावी महत्त्व आणि संस्थेतील उपलब्ध विविध शाखा यावर प्रकाश टाकला. त्यानंतर सायंन्स विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक पी. आर. मालखेडे यांनी ‘इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रभावी संवादाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी स्थापत्य विभागाचे विभागप्रमुख ए. एम. गुंडावार, मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख आर. एम. उपगन्लावार, संगणक विभागाचे विभागप्रमुख सुनील वाढई, इलेक्ट्रीकल तथा इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकॉम्युनिकेशन विभागाच्या विभागप्रमुख प्रा. चौधरी तसेच मायनिंग ॲण्ड माईन सर्व्हेईंग विभागाचे विभागप्रमुख एम. एम. डांगे यांनी आपआपल्या शाखेचे महत्त्व आणि व्याप्ती तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसीय कार्यक्रमात पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांसाठी ‘पदविकेशी संबंधित विविध उद्योग व त्यात व्यवसायाच्या संधी यावर प्रा. एल. एस. मद्दीवार यांनी मार्गदर्शन केले. मेकॅनिकल विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक विजय कोयाळ यांनी ‘सिग्नीफिकन्स ऑफ आऊटकमलेस एज्युकेशन’ या विषयावर संवाद साधला.

संगणक विभागाच्या वरिष्ठ प्रा. प्रियंका सिंग यांनी ‘करिकुलमस् इमप्लिमेंटेशन’ यावर मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे रजिस्ट्रार दिपक व्यास यांनी, विद्यार्थी जीवनातील व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व पटवून दिले. शेवटी सायंन्स विभागाचे विभागप्रमुख प्रा. एस. एन. विधाते यांनी ‘इंजिनिअरिंग क्षेत्रात विज्ञानाचे महत्त्व आणि प्रत्यक्ष जीवनात विज्ञानाचा उपयोग’ यावर अनेक उदाहरणे देऊन विस्तृत माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here