भेजगाव येथे भव्‍य नेत्र चिकित्‍सा शिबीर, श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेचा उपक्रम

 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

मूल,25 नोव्हेंबर: मानवसेवा हीच ईश्‍वर सेवा” मानून सातत्‍याने रुग्‍णसेवेचे व्रत कायम जोपासणारे राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेच्‍यावतीने २७ नोव्‍हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून ते सायं. ०५ वाजेपर्यंत शरदचंद्रजी पवार प्राथमिक शाळा भेजगाव, ता. मुल येथे नेत्र चिकित्‍सा शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे.

चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये रुग्‍णसेवेचे कार्य मागील अनेक वर्षापासून श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेच्‍यावतीने करण्‍यात येत आहे. या शिबीरांचा शहरी व ग्रामीण भागातील अनेक गोर-गरीब नागरिकांनी सातत्‍याने लाभ घेतला आहे. अनेक गरिब नागरिकांना शहरातील मोठया रुग्‍णालयातून आरोग्‍य सेवा घेणे आवाक्‍यात नसते. त्‍यामुळे ही बाब हेरुन संस्‍थेद्वारे वेळोवेळी आरोग्‍य शिबीरांचे आयोजन करण्‍यात येते. त्‍यामुळे भेजगाव येथे घेण्‍यात येत असलेल्‍या नेत्र चिकित्‍सक शिबीराला परिसरातील बहुसंख्‍य नागरिकांनी उपस्थितीत राहून लाभ घ्‍यावा अशी विनंती संस्‍थेच्‍यावतीने करण्‍यात येत आहे. ह्या शिबीराला कस्‍तुरबा गांधी रुग्‍णालय सावंगी मेघे येथील तज्ञ डॉक्‍टरांच्‍या माध्‍यमातून नेत्र तपासणी करण्‍यात येणार आहे. अशी माहीती संस्‍थेचे सचिव राजेश्‍वर सुरावार, शैलेंद्रसिंग बैस यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here