श्रीनगर येथे भारतीय जनता पक्षाची शाखा स्थापन, शेकडोच्या संख्येने लोकांची उपस्थिती

महेश बुरमवार

मो.न. 9579059379

मूलचेरा:- तालुक्यातील श्रीनगर येथे भारतीय जनता पक्षाचे शाखा स्थापन करण्यात आली, सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बंगाली बहुल लोकांची अधिक संख्या असलेल्या श्रीनगर या गावी भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकाऊन, सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे मूलचेरा तालुका अध्यक्ष प्रकाश जी दत्ता यांनी आता पर्यंत भारतीय जनता पक्षाने सर्व सामान्य जनतेसाठी ज्या कल्याणकरी योजना आणल्या या विषयी सविस्तर माहिती दिली आणि या योजनेमुळे सर्वसामान्य माणूस आज आपल्या धावपळीच्या जीवनात याचा पूर्णपणे फायदा घेत आहे असे मत त्यांनी यावेळी दिले.

त्यावेळी उपस्थिती भारतीय जनता पक्षाचे मूलचेरा तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता,उपाध्यक्ष विजय बिश्वास, जिल्हा सचिव सुभाष गणपती, विवेकानंदपूर उपसरपंच तपन मल्लिक,ग्रामपंचायत सदस्य बादल शाह,युवा मोर्चा अध्यक्ष संजीव सरकार,उपाध्यक्ष किशोर मल्लिक,उमेश सरकार,अशोतोष बेपारी,पंचनंद मिस्त्री,शंकर बनिक, प्रताप पाल,निटेन सरकार, अमर दास, गुरुदास नैताम आणि मोठ्या संख्येने गावकरी व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here