डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि कृष्णराव भेगडे फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन
नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात आले होते.
या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा. रामदास काकडे, मा. चंद्रकांत शेटे कार्यवाह, मा निरुपा कानिटकर, सदस्य आणि मा. संजय साने, सदस्य इंद्रायणी विद्या मंदिर त्याचप्रमाणे विद्यापीठ प्रतिनिधी अनिल गोरेगावकर, क्रीडा सह समन्वयक आणि निलेश भोईर, क्रीडा निदेशक यांच्या हस्ते झाले . यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी संस्थान नेहमीच खेळायला प्रोत्साहन देत असून आपल्या संस्थेतून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले असून भविष्यातही आपले विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवतील अशी सुविधा आपण त्यांना देत आहोत असे सांगितले. प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनीही उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले व महाविद्यालय देत असलेल्या विविध खेळाच्या सुविधा व प्रशस्त क्रीडांगण यांचा विद्यार्थी व खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आव्हान केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड दरवर्षी विभागीय अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे उत्साहात आयोजन केले जाते. यावर्षी विभागीय स्पर्धेचे आयोजन कृष्णारावभेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. यामध्ये पुणे विभागातील सहा जिल्ह्यांमधून 30 पेक्षा जास्त कॉलेजमधून 100 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत 100 मी., 200 मी, 400 मी. व 1500 मी. धावणे यांसह थाळीफेक, गोळा फेक, उंच उडी इत्यादी क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंनी सहभाग घेतला.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड चे कुलगुरू डॉ. के व्ही काळे व कुलसचिव डॉ. भगवान जोगी तसेच मुख्य क्रीडा समन्वयक डॉ. शिवाजीराव कराड, श्री बालाजी पुलचवाड यांचे विशेष सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. योगेश झांबरे यांनी केले तर सूत्रसंचालन सृष्टी टिळेकर व प्रिया जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. सुरेश थरकुडे व प्रा. अश्फाक मुलांनी यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्राचार्य डॉ. संभाजी मलगे, प्राचार्य जी. एस शिंदे, सर्व खेळाडू, महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापिका तेजस्विनी कोठावळे यांनी आभार मानले.