म्हसळा पोलिसांनी गोवंश वाहतुक करताना १२ खोंड आणि टाटा १५१२टेंपो सह २ आरोपींच्या आवळल्या मुसक्या  .

51
म्हसळा पोलिसांनी गोवंश वाहतुक करताना १२ खोंड आणि टाटा १५१२टेंपो सह २ आरोपींच्या आवळल्या मुसक्या  .

म्हसळा पोलिसांनी गोवंश वाहतुक करताना १२ खोंड आणि टाटा १५१२टेंपो सह २ आरोपींच्या आवळल्या मुसक्या  .

म्हसळा पोलिसांनी गोवंश वाहतुक करताना १२ खोंड आणि टाटा १५१२टेंपो सह २ आरोपींच्या आवळल्या मुसक्या  .

नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048

माणगाव : हसळा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सुरेश दिनकर पाळोदे वय ३२ यानी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसळा पोलीसानी
गुन्हा र .नं १३३/२०२३  भा .द.वि .कलम ३७९.३५३ सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनीयम१९७६ चे कलम ५( अ),९, प्राण्याना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम१ (घ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ प्रमाणे १)मोबीन अ हसन शेख वय ३० वर्षे, रा कुर्ला  २) मिराज अहमद कुरेशी या दोन  आरोपीना अटक केली, यामध्ये 
१२ खोंड गोवंश जातीचे बैल  आणि रु १२ लक्ष ५० हजार किंमतीचा टाटा कंपनीचा टेंपो नं एम .एच.०३डी.व्ही.५५१४ असा मुद्देमाल   म्हसळा पोलीसानी ताब्यात घेतला या मध्ये
दोनही आरोपीनी संगनमत करून गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल करण्याचे उद्देशाने बेकायदेशीर वाहतुक करीत होते म्हसळा साई चेक पोस्ट येथे  हवलदारानी गोरेगावच्या दिशेने भरधाव येणाऱ्या टेम्पो गाडीला आडविण्याचा प्रयत्न करताच कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याना दोनही आरोपीनी धक्का बुक्की, आणि दमदाटी दिली. म्हसळा पोलीस स्टेशनचे स.पो.नी संदीपान सोनावणे याना गुन्ह्याचे गांभीर्य कळताच त्यानी  उ . वि . पो .अ .प्रशांत स्वामी याना हकीगत कळविली . म्हसळा पोलीस स्टेशनचे हेड कॉस्टेंबल संतोष चव्हाण, शिर्के, देवरे , घोंगाणे , सुर्यकांत जाधव,मपोशि वर्षा पाटील, हंबीर, श्रीवर्धन पी.आय रिकामे ,दिघी सागरी पी.आय राजेद्र ढेबे घटनास्थळी पोहचले .सदर घटनेतील दोनही आरोपीना दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाल्याचे तपासी अधिकारी स.पो.नी संदीपान सोनावणे यानी सांगितले .
“दक्षिण रायगड मधील बहुतांश तालुक्यांतील ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणावर गोवंश वर्गातील प्राण्यांची चोरी, अनधिकृत वाहतुक ,हत्या या बाबत टोळ्या सक्रीय असून पोलीस प्रशासन सुद्धा सर्तक  झाले आहे .एम .एच.०३.डी.व्ही..५५१४ हा टेंपो आणि गोवंश महाड रायगड परिसरांतून आला अनेक भागांतून नागरिकानी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला,लोणेरे(गोरेगाव ) येथे नागरिकानी अडविण्याचा प्रयत्न केला
असता टेम्पो चालकानी सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हसळ्या कडे टेम्पो फिरविले, कर्तव्य दक्ष आणि चतुर म्हसळा पोलीसानी अखेर  दोनही आरोपींना ताब्यात घेतले . म्हसळा पोलीसांचे तालुका हिंदू समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील, बाबू बनकर, स्वप्नील चांदोरकर, मनसे तालुकाध्यक्ष सौरव गोरेगावकर,गोरेगावचे पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांनी प्रत्यक्ष भेटून म्हसळा पोलीसांचे कौतुक केले .