आर सी एफ थळ तर्फे परिसरातील गावात मोफत फिरता दवाखाना

15
आर सी एफ थळ तर्फे परिसरातील गावात मोफत फिरता दवाखाना

आर सी एफ थळ तर्फे परिसरातील गावात मोफत फिरता दवाखाना

आर सी एफ थळ तर्फे परिसरातील गावात मोफत फिरता दवाखाना
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९८३
अलिबाग: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स (आरसीएफ) निमिटेड, थळ तर्फे निगमित सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत कारखाना परिसरातील ग्रामपंचायत हद्दीत फिरते वैद्यकीय चिकित्सा वाहन (मोबाइल मेडिकल व्हॅन) माध्यमातून विनामूल्य वैद्यकीय सेवा सुरु करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक २२ नोव्हेंबर स्वागत अतिथी गृह, आरसीएफ कॉलनी, किहीम येथे कार्यकारी संचालक (वित्त) पी. शिवकुमार आणि कार्यकारी संचालक (थळ) नितिन हिरडे यांच्या शुभहस्ते या वाहनांना हिरवे झेंडे दाखवून सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

कारखाना परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्यमान उत्तम रहावे यादृष्टीने आरसीएफ तर्फ सीएसआरच्या माध्यमातून परिसरातील आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना सहाय्य, वेळोवेळी विनामूल्य आरोग्य चिकित्सा, नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन व मोफत औषधे चष्मे वाटप यांसारखे विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात याचाच एक भाग म्हणून कारखाना परिसरातील ग्रामपंचायत हद्दीत फिरते वैद्यकीय चिकित्सा वाहन (मोबाइल मेडिकल व्हॅन) माध्यमातून विनामूल्य वैद्यकीय सेवा देण्याचा उपक्रम राबविला जातो. या अंतर्गत तज्ज्ञ डॉक्टर्स वाणि फार्मासिस्ट सह दोन मेडिकल व्हॅन्स कारखाना परिसरातीन गावातील नियोजित स्थळी गरजूंची विनामूल्य तपासणी करुन औषधे देतील.

या सेवेचा शुभारंभ प्रसंगी कार्यकारी संचालक (थळ) नितिन हिरडे यांनी सद्य परिस्थितीत सर्वांगीण स्वास्थ्याचे महत्व विशद करून सीएसआरच्या माध्यमातून कारखाना परिसरात लोकोपयोगी उपक्रम राबविले जातीच याची ग्वाही दिली. कार्यकारी संचालक (वित्त) पी. शिवकुमार परिसरातील नागरिकांच्या एकंदरीत स्वास्थ्यासाठी आरसीएफ राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक करून फिरते वैद्यकीय चिकित्सा वाहन (मोबाइल मेडिकल व्हॅन) उपक्रमास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी थळ, नवगाव, बोरिस गुंजिस, किहीम, वरसोली, कुरुळ, वेश्वी इत्यादि ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि आरसीएफचे महाव्यवस्थापक (मानव संपदा प्रशासन) संजीव हरळीकर, महाव्यवस्थापक (सीएसआर) मधुकर पाचारणे, उपमहाव्यवस्थापक (मानव संपदा प्रशासन) विनायक पाटील, कॉर्पोरेट सीएसआर अॅडव्हाईजर धनंजय खामकर, वरिष्ठ व्यवस्थापक सीएसआर हर्षला शिंदे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी (थळ) संतोष वझे, वरिष्ठ अधिकारी राकेश कवळे यांसह इतर अधिकारी वर्ग व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.