Home latest News उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्य पदी राहुल सोनावळे यांची नियुक्ती
उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्य पदी राहुल सोनावळे यांची नियुक्ती
अरुण कुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
77159 18136
पनवेल :अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सचिव तथा रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकरी यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती स्थापन केली असून या समितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुल सोनावळे यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात केली आहे .
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती मध्ये राहुल सोनावळे यांची नियुक्ती करण्यात आली असून राहुल सोनावळे हे रायगड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सामाजिक काम करीत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे विश्वासू कार्यकर्ते असून रायगड जिल्ह्यात कुठेही दलित ,आदिवासी ,बहुजन समाजावर अन्याय होत असेल तेव्हा नेहमी ते अग्रेसस राहून पीडितांना न्याय देण्यासाठी कार्यरत असतात .त्यांच्या कामाची दखल शासनाने घेऊन समितीचे सचिव यांनी राहुल सोनावळे यांची निवड सदस्य पदी केल्याने जिल्ह्यातील भीमसैनिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे .