केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या ‘पत्रकार प्रशिक्षण’ कार्यशाळा;उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

63

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या ‘पत्रकार प्रशिक्षण’ कार्यशाळा;उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कृष्णा गायकवाड
प्रतिनिधी
9833534747

पनवेल:केंद्रीय लोकशाही पत्रकार संघातर्फे (Central Democracy Journalist Association) संघातील सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळेला पत्रकारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. निसर्गाच्या रम्य सानिध्यात आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांच्या पुढाकाराने या विशेष एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दैनंदिन बातम्यांच्या धावपळीतून काही क्षण बाजूला काढत पत्रकारांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला.
या कार्यशाळेत प्रामुख्याने ‘आधुनिक पत्रकारिता’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या काळात माध्यमांचे स्वरूप आणि पत्रकारापुढील आव्हाने यावर यावेळी मंथन झाले. याप्रसंगी बोलताना डॉ. मुनीर तांबोळी यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीची माहिती दिली. तसेच, रायगड आणि पनवेल कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रशिक्षणासोबतच पत्रकारांमधील स्नेहभाव वाढीस लागावा यासाठी स्नेहभोजन आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित पत्रकारांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
या एकदिवसीय कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांच्यासह अबरार मास्टर, राज सदावर्ते, सुधीर पवार, सूरज नागे, कृष्णा गायकवाड, निलेश भगत, राहुल कांबळे, प्रल्हाद गायकवाड, आशिष मोहोकर, योगेश पगडे आदी सदस्य उपस्थित होते.