Home latest News अलिबाग नगरपरिषद निवडणूक भाजपचे उमेदवार अँड. अंकित बंगेरा यांच्या प्रचाराला वेग
अलिबाग नगरपरिषद निवडणूक भाजपचे उमेदवार अँड. अंकित बंगेरा यांच्या प्रचाराला वेग
मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रभाग क्रमांक ७ ‘ब’ मधून भाजपचे अधिकृत उमेदवार अँड.अंकित बंगेरा यांच्या प्रचार मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. त्यांच्या समर्थनार्थ भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या नेत्यांनी घर-घर जाऊन मतदारांशी संवाद साधत गाठीभेटी घेतल्या.
अँड. अंकित बंगेरा यांनी आज मतदारांसमोर भविष्यातील विकास आराखडा मांडत, मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता व्यवस्था, रस्ते आणि पाणीपुरवठा याबाबत ठोस आश्वासने दिली.
“विकास हा दिखावा नसून वास्तवात उतरलेला हवा. नागरिकांच्या समस्या ओळखून त्यांचे निराकरण करणे ही माझी जबाबदारी असेल,” असे ते या भेटीदरम्यान म्हणाले.
प्रचार कार्यक्रमाला भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना संघटित पद्धतीने मतदारांपर्यंत संदेश पोहोचवण्याचे आवाहन केले.
या भेटीदरम्यान अनेक मतदारांनी अँड. अंकित बंगेरा यांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करत, भाजपच्या उमेदवाराला सकारात्मक प्रतिसाद दिला. स्थानिक पातळीवर हा प्रचार मोहीम प्रभावी ठरत असून मतदारांनी त्याचे उस्फुर्त असे स्वागत केले.आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ ‘ब’ मध्ये रंगत निर्माण झाली आहे.