भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला

35

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक १८/०२/२०२५ च्या परिपत्रकान्वये आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त श्री.अनमोल सागर (भा.प्र.से) यांचे निर्देशानुसार आज दिनांक २६/११/२०२५ रोजी संविधान दिनानिमित्त महानगरपालिका मुख्यालयात तळ मजल्यावर मा.अतिरीक्त आयुक्त श्री.विठ्ठ्ल डाके यांच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान उद्देशिकाचे सामुहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्यास मा. अतिरीक्त आयुक्त श्री.विठ्ठल डाके व माजी नगरसेवक श्री.विकास निकम यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच जुनी महानगरपालिका इमारत कार्यालय समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धपुतळ्यास मा.सहाय्यक आयुक्त श्री.शैलेश दोंदे, तर प्रभाग समिती क्र.४ अंजुर फाटा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धपुतळ्यास प्रभाग समिती ४ चे कार्यालयीन अधीक्षक
श्री.अनिल आव्हाड यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. रामप्रसाद सोळुंके, मा.उप-आयुक्त (कर) श्री. बाळकृष्ण शिरसागर, सहा.आयुक्त (निवडणुक) श्री.अजित महाडीक, सहा.आयुक्त (करमुल्यांकन) श्री. सुधीर गुरव, समाज कल्याण विभाग प्रमुख श्री. मिलींद पळसूले, माहिती व जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी, मार्केट विभाग प्रमुख श्री स्नेहल पुण्यार्थी, उद्यान विभाग प्रमुख श्री निलेश संखे, वाहन विभाग प्रमुख शेखर चौधरी, प्रशांत संखे व महानगरपालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.