मुहुर्त सापडला.. तोच उत्साह.. तोच जल्लोष.. अखेर म्हसळा नगरपंचायवर शिवसेनेचा भगवा फडकला…

62

मुहुर्त सापडला.. तोच उत्साह.. तोच जल्लोष.. अखेर म्हसळा नगरपंचायवर शिवसेनेचा भगवा फडकला…

मंत्री भरतशेठ गोगावले यांनी करून दाखविले…!!

म्हसळा: संतोष उद्धरकर.

म्हसळा: गेल्या काही दिवसात म्हसळा नगरपंचायतचे राजकारण चर्चेत होते. त्याला आज पूर्णविराम मिळून अखेर म्हसळा नगरपंचायतवर भगवा फडकला. म्हसळा नगरपंचात मध्ये सत्ता परिवर्तन होऊन गेली कित्येक वर्षाची मक्तेदारी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी मोडीत काडीत म्हसळा नगरपंचायतवर भगवा फडकवुन शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष बसविण्यात यशस्वी चाल करण्यात आली, मंत्री भरतशेठ गोगावले यांनी करून दाखविले, यावेळी प्रसारमाध्यम यांच्याशी बोलतांनी आम्ही जे बोलतो ते करून दाखवितो असे बोलुन आज हजारोच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते नगराध्याक्षा यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत त्यांचे मी मनापासुन स्वागत करतो. म्हसळा नगरापंचायतीच्या माध्यमातुन म्हसळा शहराचा जो काही विकास करायचा आहे ते आमचे नेते नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री म्हणुन माझी जबाबदारी असेल. जो विकास रखडलेला आहे तो आम्ही करण्यास कटीबध्द आहोत असे मंत्री भरतशेठ यांनी विश्वास व्यक्त केला. काहींना वाटते माणगाव घेतला म्हणुन ते राजे झाले असे काही नसते इथेच करा आणि इथेच भरा असा विरोधकांना सणसणीत टोला लगावला. म्हसळा नक्कीच बदलणार तसेच श्रीवर्धन व म्हसळा ही आमची जबाबदारी आहे असे ठाम मत व्यक्त केले. यावेळी म्हसळा तालुक्याच्या वतीने रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्षा फरीन अ. अजीज बशारत यांना पुपगुच्छ देऊन पदभार स्विकारण्यास सांगितले. यावेळी एकच जल्लोष करून फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटण्यात आले.. शिवसेना जिंदाबाद चा जयघोष करून भरतशेठ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. असे बोलुन एकच उत्साह दाखविण्यात आला.
यावेळी म्हसळा राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्ते यांनी काळे झेंडे दाखवुन निषेद व्यक्त करून दोन्ही पक्षा तर्फे शाब्दीक चकमक होतांना पहायला मिळाली. श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या नेतृत्वा खाली तसेच पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनात म्हसळा पोलीसांनी वेळीच योग्य ती खबरदारी घेऊन अतिशय उत्तम प्रकारे सहकार्य केले. म्हसळा एच पी पेट्रोल पंप ते बाजार पेठ इथपर्यंत भव्य रॅली देखील काढण्यात आली होती. यावेळी म्हसळा तालुक्यातील हजारोंच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते उपस्थित होते.