15 वर्षीय मुलीची गळफास लावून आत्महत्या.

53

15 वर्षीय मुलीची गळफास लावून आत्महत्या.

15 वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या राहत्या घरी छताला गळफास लावून आत्महत्या केली.

नागपूर :- पिपळा डाकबंगला अल्पवयीन मुलीने तिच्या राहत्या घरी छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना खापरखेडा ता. सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा डाकबंगला येथे गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास डली.

युती जवाहरलाल टेंबरे 15 वर्षीय, रा. पिपळा डाकबंगला, ता. सावनेर असे मृत मुलीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी तिचे आईवडील शेतात कामाला गेले हाेते तर धाकटी बहीण इशू ही घराशेजारी खेळत हाेती. घरी कुणीही नसल्याचे पाहून युतीने छताच्या लाेखंडी ॲंगलला साडीच्या मदतीने गळफास लावून घेतला. काही वेळाने इशू घरी आल्यावर तिला युती लटकलेल्या अवस्थेत दिसली. तिने लगेच शेजाऱ्यांना सांगितले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.