हिवाळी अधिवेशनात कोरोना घुसला, हिंगणाचे आमदार समीर मेघे कोरोना बाधित.

60

हिवाळी अधिवेशनात कोरोना घुसला, हिंगणाचे आमदार समीर मेघे कोरोना बाधित.

हिवाळी अधिवेशनात कोरोना घुसला, हिंगणाचे आमदार समीर मेघे कोरोना बाधित.
हिवाळी अधिवेशनात कोरोना घुसला, हिंगणाचे आमदार समीर मेघे कोरोना बाधित.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442

नागपूर:- राज्यात कोरोना वायरसच्या नव्या व्हेरीयन्ट ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. आता तर महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही कोरोनानं शिरकाव केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामूळे हिवाळी अधिवेशन लवकरच गुंडाळल्या जाणार काय ?

नागपुर जिल्हातील हिंगणा विधानसभा क्षेत्रातील भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात समीर मेघे यांची भेट घेतलेले इतरही आमदार आता धास्तावले आहेत. समीर मेघे यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. फेसबुकच्या माध्यमातून सोशल मिडीया वर पोस्ट करुन लिहीत त्यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं म्हटलंय.

कोरोनाची लागण झाल्याचं कळताच समीर मेघे हे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत. नागपुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रकृती बिघडल्यानं समीर मेघे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, ऐन हिवाळी अधिवेशनात सभागृहातीलच एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं सगळ्याच आमदारांची चिंता वाढली आहे.

22 तारखेला समीर मेघे हे विधानसभा अधिवेशनासाठी सभागृहात हजर होते. यावेळी त्यांनी विधानसभेत इतरही आमदार आणि मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या आमदार, विधानसभेतील कर्मचारी वर्ग यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे. यातूनही इतरांना संसर्ग झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मेघेंच्या संपर्कात कोण आलं?

ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्क झालं आहे. अनिल परब यांनी विधानसभेत रात्रीच्या वेळी जमावबंदी करण्याचा निर्णय सरकार घेत असल्याची माहिती दिली होती. यानंतर आता सभागृहातीलच आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं अधिवेशन कसं पार पडतं, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. सोमवारी विधानसभेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रकिया सुरु होणार आहे. तर मंगळवारी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी मतदान पार पडणार आहे.

दरम्यान, आता भाजप आमदार समीर मेघेंच्या संपर्कात आलेल्या इतर आमदारांचीही कोरोना चाचणी करावी लागणार आहेत. त्यातून कुणी पॉझिटिव्ह आढळतं का, हे चाचणीचे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. मात्र इतरही आमदार पॉझिटिव्ह आढळून आले, तर नेमका काय निर्णय या हिवाळी अधिवेशनाबाबत घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.