जेष्ठ नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १० जानेवारीपासून बुस्टर डोस दिले जाणार, लहान मुलांचे देखील कोरोना लसीकरण सुरु.

64

१० जानेवारीपासून लसीचा तिसरा म्हणजे बुस्टर डोस दिला जाणार. १५ ते १८ वर्षातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरु

जेष्ठ नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १० जानेवारीपासून बुस्टर डोस दिले जाणार

सिद्धांत
मुंबई २६ डिसेंबर २०२१: ओमिक्रॉनचा वाढत जाणारा प्रसार लक्षात घेता देशामध्ये आरोग्य सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, जेष्ठ नागरिक याना कोरोना लसीचा तिसरा डोस म्हणजे बुस्टर डोस दिला जाणार आहे. शनिवारी देशातील जनतेला संबोधून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल गोष्टीना केली.

तसेच १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणाला सुद्धा परवानगी देण्यात आली असून, जवळच्या लसीकरण केंद्रात येत्या ३ जानेवारीपासून या वयोगटातील मुले कोरोना प्रतिबंधित लस घेऊ शकतात. लहान मुलांच्या लसीकरणामुळे त्यांच्या शाळा नियमितपणे सुरु करण्याच्या पर्यायाकडे लवकरात लवकर वाटचाल करता येईल असेही पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले.

विविध व्याधीने त्रस्त असलेले सामान्य नागरिक सुद्धा डॉक्टर्सच्या सल्ल्याने कोरोना लसीचा बुस्टर डोस घेऊ शकतात.

नाकावाटे घेतली जाणारी कोरोना प्रतिबंधित लस आणि जगातील पहिली डीएनए कोरोना लस देखील भारतामध्ये लवकरच सुरु होईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

पंतप्रधानांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार देशातील ६१ % जनतेचे कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असून ९० % लोकांनी लसीचा किमान एक डोस घेतलेला आहे. भारतामध्ये सध्या ७६७६६ ऍक्टिव्ह कोरोना  रुग्ण असून ओमिक्रॉन संसर्ग झालेल्यांची रुग्णसंख्या ४१५ वर गेली आहे.