kabaddi-history-in-india-and-pro-kabaddi
प्रो-कबड्डी लीग भारतातील कबड्डी खेळाचा इतिहास आणि कबड्डी लीगचा उदय
kabaddi-history-in-india-and-pro-kabaddi
प्रो-कबड्डी लीग भारतातील कबड्डी खेळाचा इतिहास आणि कबड्डी लीगचा उदय

सिद्धांत
२६ डिसेंबर २०२१: कबड्डीचा जन्म भारतात झाला. वर्षोनुवर्षे कबड्डीच्या जगात भारताने निर्विवाद राज्य केलं. आजवर खेळल्या गेलेल्या सात कबड्डी वर्ल्डकप पैकी सहा वर्ल्डकप भारताने जिंकले आहेत. मधल्या काळात क्रिकेट सारख्या खेळांच्या गर्दीत देशातल्या गावागावात खेळल्या जाणाऱ्या कबड्डीचा आवाज थोडा शांत झाला होता. परंतु मग प्रो-कबड्डी लीगची सुरुवात झाली आणि कबड्डी खेळाचा चेहरामोहरा बदलला.

कबड्डीची लोकप्रियता शिखरावर पोहचली. इतकी की आजच्या घडीला आयपीएल नंतर प्रो-कबड्डी लीग सर्वात जास्त पहिला जाणारा स्पोर्टींग इव्हेंट बनला आहे. सध्या प्रो-कबड्डी लीगचा आठवा सिझन सुरु असुन, त्यानिमित्त कबड्डी खेळाबद्दलच्या काही अनोख्या गोष्टी जाणून घेऊया.

1. असं मानले जाते की, कबड्डी खेळ भारतामध्ये गेल्या चार हजार वर्षांपासून खेळाला जात आहे.

2. “कबड्डी” या शब्दाचा उगम तामिळ भाषेतील “काय-पीडी” या शब्दापासून झाला आहे. “काय-पीडी” या शब्दाचा अर्थ “हात धरणे” असा होतो.

3.कबड्डीचा उदय जरी भारतात झाला असला तरी, बांगलादेश देशात राष्ट्रीय खेळ म्हणून ” कबड्डी” खेळाला मान्यता दिली गेली आहे.

4.१९९५ साली भारतात पहिल्यांदाच महिलांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २०१० मध्ये आशियाई क्रीडास्पर्धेमध्ये महिला कबड्डी सामन्यांना सुरुवात झाली होती.

5. १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये जगाला भारतीय कबड्डी या खेळाची ओळख झाली. बर्लिन ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्रातील अमरावती शहरातील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संस्थेच्या संघाने कबड्डीचे प्रात्यक्षिक जगासमोर मांडले. पण दुर्देवाने आजवर कबड्डीला ऑलिम्पिक खेळाचा दर्जा दिला गेलेला नाही.

6. प्रो-कबड्डी लीगमुळे कबड्डी फक्त भारतातच नव्हे तर जगभरातल्या अनेक देशातील घराघरात पोहचली आहे. आज प्रो-कबड्डी लीगमध्ये 34 देशातील खेळाडू सहभागी होतात.

7. प्रो-कबड्डीने खेळाला भारताच्या घरातील टीव्हीवर पोहचवले. त्याचबरोबर कबड्डी खेळाडूंना आर्थिक सुबत्ता मिळवून दिली. २०१४ च्या पहिल्या सिझनमध्ये राकेश कुमारला पटणा पायरेट्स संघाने सर्वात जास्त म्हणजे १२.८० लाख संघाला साइन केले होते. २०२१ च्या आठव्या सिझनमध्ये खेळाडूंची साईनिंग किंमत कोटीच्या घरात पोहचली आहे. यु.पी. योद्धा संघाकडून खेळणारा प्रदीप नरवाल आजवरची सर्वात जास्त म्हणजे १.६५ कोटी साईनिंग अमाऊंट घेणारा खेळाडू बनला आहे. मोनू गोयल, सिद्दार्थ देसाई, नितीन तोमर, रिशांक देवगडिया या खेळाडूंची साईनिंग अमाऊंट एक कोटीच्या घरात गेली आहे.

8. प्रो- कबड्डीचा आठव्या सिझन मध्ये देशभरातील १२ संघ खेळत असून प्रत्येकी १० पॉईंट्स सह दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स पॉईंट्स टेबलमध्ये अग्रक्रमांकावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here