सावनेर आगारात लढा विलीनीकरणाचा संबंधित नागपूर आगारातील वरिष्ठांचे मार्गदर्शन.
अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी मो.नं.-9822724136
सावनेर
25डिसेंबर2021
सावनेर येथे शनिवार ला विलीनीकरणा साठी जो दुखवटः आदोलन सुरु आहे आगारात एस. टी.महामंडळ राज्यशासनात विलीनीकरण का झाली पाहिजे या रास्त व न्यायप्रविष्ठ मागणीसाठी सभा व चर्चा आयोजीत करण्यात आली होती.सदर सभेला नागापुर आगारातील कामगाराचे शिष्ठमंडळ प्रामुख्याने उपस्थित होते आपला लढा विलीनीकरणाचा या विषयावर चर्चा करून हा लढा विलीनीकरणाचा दुखवटः पाळत असताना राज्य शासन आणि महामंडळ प्रशासनाने कामगारावर केलेल्या अत्याचार व दडपणशाही धोरणाचा विरोध दर्शवून कामगाराची होत असलेली आर्थिक विवंचना व त्यामुळे कामगार हा मानसिक दृष्ट्या झालेले खच्चीकरण यावर चर्चा करण्यात आली तसेच विधान सभेत ना.अजीत पवार साहेब (उपमुख्यमंत्री ) यानी एस.टी.कामगारानी राज्यशासनात विलीनीकरण हा विचार डोक्यातून काढून टाका असे विधान करून कामगाराच्या जखमेवर मिठ चोळल्या सारखे केले.त्यांच्या या विधानामुळे एस.टी.कामगारात कमालीचा असंतोष निर्माण झाला असून सावनेर आगारातील कामगारांनी सभेत तिव्र जाहीर निषेध केला.
नागपुर आगारातील कामगार शिष्ठमंडळात श्री.प्रविण डफरे,हिमांषु पौनिपगार,संदिप मानकर,किरण मस्के,प्रविण गुघे,अतकर,शाहु, बन्ने, प्रतिष्टित कामगार यानी विलीनीकरणावर मार्गदर्शन केले.नागपुर कामागर शिष्ठमंडळाचे स्वागत सावनेर आगारातील श्री.अश्विन पानोरे यांनी आगारातर्फे पाहुण्याचे स्वागत केले.आज पर्यन्त लढा विलीनीकरणाचा हा दुखवटः पाळत असताना शाहिद झालेल्या ५९ कामगार बांधवाना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.
सदर कार्यकमाचे सुत्र संचालन श्याम कुमरे यानी केले.तर कार्यकमाचे समापन संभाषण पर विचार श्री.चंद्रशेखर उमक यानी मांडले.
सदर कार्यकमात सावनेर अगारातील जगदिश बहुरूपी, श्रीधर निकोसे,नियाज अहमद, संदिप बेारकर,आमीन खान, वैभव बारिया,लोखडे,पारसे,सुरेश धुर्वे,गोखे,गेडाम,डाखोळे,प्रफुल मडके,रोहित बागडे,वाढीकर, चंदुजी महाजन,संजय करडभाजणे,खुशाल लाखे,सौ. सोनेकर,सौ.लामसे,पुरुषोत्तम ढोबळे,शिवाजी वाट,आंजणकर तसेच सावनेर आगारातील समस्त कर्मचारी उपस्थित होते.